Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




मातृत्वाचा शृंगाररस

मातृत्वाचा शृंगाररस

चंदन चांदणं गोंदण ल्याली
नवथर कांती तनू सुकुमार
अर्ध मोकळ्या केसावरती
माळून गजरा चंद्राकार

कुठे निघाली चंचल रमणी
थबकत लचकत हरिणी समान
सरकत शेला सावरलेला
धरत रोखुनी नयन कमान

ठुमकत मुरडत गवळण राधा
जणू विहरत यमुनाकाठ
गोप बघुनी झाकू पाहते
पदराखाली भरला माठ

हिंदोळणाऱ्या पदरासंगे
डुचमळते बेचैन उभार
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार

अर्ध्या उघड्या पाठीवरती
भुरुभुरू केसांचे नर्तन
नाभी भवती करुनी रिंगण
पिंगा खेळतो द्वाड पवन

गुलाब जाई मोहित होई
रूप गोजिरे पद्मसमान
लपून आडून चोरून बघती
फुलामागुनी पिकले पान

कुणी म्हणाले शेंग चवळीची
कुणी म्हणाले पेवंदी आम
कुणी म्हणाले कामुक मैना
खुदुखुदू हसुनी रमताराम

कुण्या मुलखाची राजपरी ही
कुजबुज करती वल्लीशिवार
जशी घडविली, तशी मढवली
ही रंगीली नटवी नार

तव वदली ती प्रसन्नवदना
हो मी आहे नटवी नार
खळखळ वाहत असतो माझ्या
नसानसातुनी रस शृंगार

विरक्तीला लुब्ध कराया
करीत पीयुषाची पखरण
सजणेधजणे, लटक, मटकणे
प्रीत लालित्याची उधळण

जरी दिसतो तुम्हां दुरुनी
माझ्याठायी हा एकच रस
परी मी आहे सर्व रसांचा
जणू घुसळला अमृतरस

कधी असते मी झाशी, अहिल्या
मीच कालिकेचा अवतार
मी राधिका, मीच मीरेच्या
अद्वैत भक्तीचा एकतार

मीच कैकेयी, मी कौशल्या
मी वनवासी जनकाची लेक
मीच देवकी, मीच यशोदा
माझे स्वरूप, रूप अनेक

मीच भीमाई, मी जीजाऊ
मी क्रांतीची ज्योतमशाल
पंकामध्येही पंकजाची
पालनकर्ती मी मृणाल

आदी माया आदी शक्ती
सचेतनाची मी सृजक
जैवजिवांची उत्पत्ती अन
प्रणयरसाची मी पूजक

स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी
सजीव सृष्टी माझं बाळ
ब्रह्मांडाला व्यापून उरली
माझ्या मातृत्वाची नाळ

- गंगाधर मुटे 'अभय'
==============
अठरा/दहा/चोवीस

Share

प्रतिक्रिया

  • navnath pawar's picture
    navnath pawar
    सोम, 21/10/2024 - 21:13. वाजता प्रकाशित केले.

    वाह! सुरुवात शृंगार रसाचा परिपाक आणि  शेवट एका तेजस्वी विचाराने.. मूळ गाभा भारी आहे.

    स्त्रीचे विश्व रूप दर्शन घडवणारी कविता. स्त्रीकडे रमणी म्हणून पहायचा प्रघात आहे. त्यात वावगे काहीच नाही. मात्र तिला त्याच त्या रूपाच्या साखळदंडात कैद केले जाते, तेव्हा तिचे आत्मभान जागे करायची गरज पडते. ही कविता तो परिणाम साधून जाते. अंतर्मुख करते.

     
    - नवनाथ पवार 

    Navnath Pawar
    Aurangabad, Maharshtra

  • अतिथी सदस्य's picture
    अतिथी सदस्य (-)
    सोम, 21/10/2024 - 21:18. वाजता प्रकाशित केले.

    श्रृंगार रसातुन विर, करुणा, भक्ति, मातृत्व रसा कडे परावर्तीत होणार हे सर्वश्रेष्ठ काव्य अप्रतिम, विलक्षण आणि शब्दापलीकडले आहे मुटे सर . खरंच अंतरंगाचा ठाव घेणारी रचना. ... आपल्या काव्य प्रतिभेला माझा साष्टांग दंडवत. 

     
    Sanjay Bhong   (Sanjay Bhong)
  • Sandhya Patil's picture
    Sandhya Patil
    सोम, 21/10/2024 - 21:21. वाजता प्रकाशित केले.
    क्या बात है संपूर्ण नऊ रसात भिजवली कविता खूप अर्थपूर्ण, आशयघन नि देखणी रचना साकारली अप्रतिम अप्रतिम
    खूप अभिनंदन
     
    - Sandhya Patil
  • अतिथी सदस्य's picture
    अतिथी सदस्य (-)
    सोम, 21/10/2024 - 21:25. वाजता प्रकाशित केले.
    वाह वाह अति सुंदर विदुशकालाही आपलीसी वाटावी व संत म्हणतांनाही आपलीसी वाटावी अशी दुहेरी शृंगाराणे सजलेली व गोडव्याने परिपूर्ण अशी ही काव्य रचना
    खूपच मनमोहक व छान
     
    - Baburao Ganpat Narote
    Baburao Ganpat Narote
  • Narendra Gandhare's picture
    Narendra Gandhare
    सोम, 21/10/2024 - 21:27. वाजता प्रकाशित केले.
    एकदम झक्कास ... एकदम झक्कास.
     
    - Narendra Gandhare

    Narendra Gandhare

  • ravindradalvi's picture
    ravindradalvi
    सोम, 21/10/2024 - 21:28. वाजता प्रकाशित केले.
    अफाट सुंदर ,वाह ... सर
     
    - Ravi Dalvi

    रवींद्र अंबादास दळवी
    नाशिक

  • अतिथी सदस्य's picture
    अतिथी सदस्य (-)
    सोम, 21/10/2024 - 21:31. वाजता प्रकाशित केले.
    अप्रतिम शब्द संपदेने रंगवली...सुरुवातीची काही कडवी वेगळीच अन् समारोप तर अंतर्मुख करणारा ठरला...सर्व रस,अन् अजूनही काय काय.. वाह!
     
    - Sanjay Kaware
  • तुळशीराम बोबडे's picture
    तुळशीराम बोबडे
    सोम, 21/10/2024 - 21:33. वाजता प्रकाशित केले.
    शृंगार, , करुणा, भक्ती,
    रस ओतले किती
    नमन गंगाधरा
    धन्य काव्यनिर्मिती
     
    - Tulshiram Bobade
  • Prashant Zilpe's picture
    Prashant Zilpe
    सोम, 21/10/2024 - 21:37. वाजता प्रकाशित केले.
    काही दिवसांपूर्वी आपण शृंगार प्रधान काव्य करण्याविषयी पोस्ट टाकली होती. आता लगेच हे अप्रतिम काव्य! १८/१०/२४ म्हणजे कालच.
    आपली प्रतिभा कमालीच्या बहारात असल्याचे दिसत आहे.
    शृंगार आणि भक्ती रसाचे एकत्रित इतके विलोभनीय स्वरुप फार क्वचीतच बघायला वाचायला मिळते.
    होउन जाउ द्या अश्याच काही आणखी सर्वांग सुंदर कविता. मंत्रमुग्ध करणाऱ्या.
     
    - Prashant Zilpe
  • दत्ता राऊत's picture
    दत्ता राऊत
    सोम, 21/10/2024 - 21:38. वाजता प्रकाशित केले.
    एकदम बेस्ट !
     
    - दत्ता राऊत

    जय गुरूदेव

  • अतिथी सदस्य's picture
    अतिथी सदस्य (-)
    सोम, 21/10/2024 - 21:40. वाजता प्रकाशित केले.
    वाह गंगाधरजी, शृंगार ते भक्तिमार्गाचा सुंदर मिलाप...
     
    - Vidyanand Hadke
  • Sanjay Thakre's picture
    Sanjay Thakre
    सोम, 21/10/2024 - 21:43. वाजता प्रकाशित केले.
    शेवटच्या दोन ओळी तर अप्रतिम! अप्रतिम आणि केवळ अप्रतिम!! सारं गर्भित!!
     
    - Sanjay Thakre
  • Pradip Deshmukh's picture
    Pradip Deshmukh
    सोम, 21/10/2024 - 21:45. वाजता प्रकाशित केले.
    खूप सुंदर सर!
     
    - Pradip Deshmukh

    प्रदीप बा देशमुख

  • A.B.Patil's picture
    A.B.Patil
    बुध, 23/10/2024 - 14:28. वाजता प्रकाशित केले.

    सर्व सजीव सृष्टी मधील माता आणि तिचे मातृत्व हा कवितेचा केंद्रबिंदू आहे. मानवी स्त्री कवितेत केवळ त्या मातृत्वाचे प्रतिनिधित्व करते. मानवी स्त्री कवितेची नायिका असणे, कवितेची गरज म्हणून निमित्तमात्र आहे.

    मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, जवळजवळ ते एकसमानच असते.

    माणूस, पशु, पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत.

    माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण/रस अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे.

    सर्व रसांनी परिपूर्ण नाही असे मातृत्व असू शकत नाही. जसे मानवी स्त्रीमध्ये स्त्रीत्व जन्मताच येते तसेच मातृत्वही उपजत असते. शृंगार ही मातृत्वाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे कोणतेच मातृत्व शृंगारहीन असू शकत नाही.

    मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. उदाहरणार्थ... कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशल्येची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे.

    कविता तुकड्या तुकड्यात दिसत असली तरी मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे कविता एकजिनसी आहे. मातृत्व आणि मातृत्वाच्या प्रेरणा केंद्रबिंदू म्हणून कविता वाचली तर कविता उलगडायला फार अवघड जाऊ नये.

  • पाने