Skip to main content Skip to footer
Home

Search form

User login

  • Create new account
  • Reset your password

Main menu

  • ताजे अद्यतन
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • लेखनस्पर्धा
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : निकाल

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 12:41 AM IST, Fri January 15, 2021

Sharad Joshi

शेतकरी साहित्य चळवळ

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : वर्ष ७ वे

(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी

यांच्या ८५ व्या जयंतीदिनानिमित्त (३ सप्टेंबर २०२०)  
 
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२० : निकाल



लेखनाचा विषय : शेती आणि कोरोना

            ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही, कदाचित असाच याचा अर्थ आहे.

         पण; आता शेतकर्‍यांच्या मदतीला नवीन संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ७ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे सातवे वर्ष.

        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर २०२० ते ०२ ऑक्टोबर २०२० या कालावधीत बळीराजा डॉट कॉम (www.baliraja.com ) या संकेतस्थळावर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.

       शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय "शेती आणि कोरोना" असा जटिल असल्याने  या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.

         लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : श्री सिद्धार्थ भगत (यवतमाळ), प्रा. चित्रा कहाते (नागपूर), जनार्दन म्हात्रे (ठाणे), प्रा. मनीषा रिठे, श्री प्रफुल्लजी व्यास, श्री दत्ता राऊत (वर्धा), सौ. गीता खांडेभराड (जालना), ऍड प्रदीप पाटील (मुंबई), श्री वासुदेव सुभेदार (बुलडाणा), श्री योगेश गिरडकर (नागपूर)

 

 Result

Ramram  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार  Ramram
आणि
Congrats विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!! Congrats 
पारितोषिकाचे स्वरूप : मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके
पारितोषिक वितरण :
  1. २० आणि २१ मार्च २०२१ मध्ये रावेरी येथे आयोजित सातव्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
  2. स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
अत्यंत महत्वाचे निवेदन :
            पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. २५/०१/२०२१ पर्यंत आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. ज्यांनी नोंदणी केलेली असेल फक्त त्यांचे नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती  http://www.baliraja.com/rep-regd  येथे उपलब्ध आहे.

सहकार्याच्या अपेक्षेत!

गंगाधर मुटे

   अध्यक्ष

 अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ



दिनांक : १५/०१/२०२१

~~~~~~~~~~~~~~~~~~
  1. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल
  2. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ : निकाल
  3. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल
  4. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल
  5. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : निकाल
  6. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल
  7. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : निकाल

~~~~~~~~~~~~~~~~~~

          


Attachment Size
result-sheet-20.jpg 384.95 KB
LS-2020.jpeg 377.15 KB
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२०
साहित्य चळवळ
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7875 views

Comments (3)

sahasik wrutt

गंगाधर मुटे

Saturday, January 16, 2021 - 12:27
Permalink
New

lekhan spardha

  • Log in or register to post comments
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक

श्री. अनिकेत देशमुख

Saturday, January 16, 2021 - 14:23
Permalink
New

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • Log in or register to post comments

In reply to sahasik wrutt by गंगाधर मुटे

अभिनंदन

swachchhandi87…

Sunday, January 17, 2021 - 18:10
Permalink
New

सर्व सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन.....
आयोजक, परीक्षक यांचे
मनापासून आभार

  • Log in or register to post comments

Search

वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

User Menu

  • माझ्या वाचनखुणा
  • My Bookmarks

User login

  • Create new account
  • Reset your password

Who's online हजर पाहुणे

There are currently 2 users online.
  • admin
  • गंगाधर मुटे
Who's new नवीन सदस्य
  • Narayan Sangale
  • Anil Ranjak Ch…
  • Sunit
  • lawateska
  • RAVICHAPKE
  • sanjaymeshram
  • डॉ. उपेंद्र बळ…
  • Subhash.patil
  • SNEHA TERDE
  • Adv Satish Borulkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 23 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    2 days ago
  • आता तयार व्हावे
    2 days ago
  • गंगाधरजी, "दुपट्टा घसरणे
    1 month 3 weeks ago
  • १५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
    2 months 1 week ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ