सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, रावेरी
दिनांक : शनिवार, रविवार, २० व २१ मार्च २०२१
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, भूमीकन्या सीताकुटी, रावेरी ता. राळेगाव जि. यवतमाळ
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. २० व २१ मार्च २०२१ रोजी रावेरी जि. यवतमाळ येथे दोन दिवशीय ७ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
स्थानवैशिष्ट्य : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून २ कि.मी अंतरावर असलेल्या रावेरी या छोट्याशा खेड्यात सोबत राम नसलेल्या एकट्या भुमीकन्या सीतामाईचे मंदीर आहे. शेतकरी संघटनेच्या मा. श्री. शरद जोशींनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. स्त्रीत्वाचे आत्मभान आणि आत्मसन्मान जपणारी पावनभूमी म्हणून देशातील एकमेव असलेल्या या सीतामंदीराचे आगळेवेगळे स्थान आहे. रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात लवकुशाचा जन्म होऊन अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवेपर्यंत याच रावेरी गावात सीतेचे वास्तव्य होते, असा पौराणिक इतिहास आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक बघाव्या :
कार्यक्रमाचे स्वरूप :
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात “हिरव्यागार शेतीला हवा कार्बन क्रेडीटचा लाभ” “कोरोनाचे शेतीवरील परिणाम” “बाजारस्वातंत्र्य आणि नवे विधेयक” “दडायचे नाही, आता भिडायचे” "अधिक उत्पादन : फायद्याचे कि तोट्याचे" अशा विविध विषयावरील परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी कथाकथन व प्रकट मुलाखत असे स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा विश्वास आहे.
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking) :
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
- गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ
प्रतिक्रिया
कमी वेळ शिल्लक आहे
नमस्कार मंडळी,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे साहित्य संमेलन जरा बऱ्याच उशिरा जाहीर करावे लागले. आता आपल्याकडे नियोजनासाठी फारच कमी अवधी शिल्लक असल्याने आपल्याने वेगवान गतीने वाटचाल करावी लागेल.
१) पुढील दोन दिवसात लेखनस्पर्धा २०२० चा निकाल जाहीर केला जाईल.
२) प्रतिनिधी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल आणि २० जानेवारीपर्यंत परिसंवाद, कविसंमेलन आणि गझल मुशायऱ्याचा सहभाग निश्चित करावा लागेल.
आपणास विनंती आहे कि आपण या वेगवान कामात जलदगतीने सहकार्य करावे.
शेतकरी तितुका एक एक!
बातम्यांच्या लिंक
बातम्यांच्या लिंक :
१) https://www.tarunbharat.net/Encyc/2021/1/9/Marathi-Shetkari-Sahitya-Samm...
३) https://kanosa.in/1435/
शेतकरी तितुका एक एक!
रावेरी यवतमाळ येथे होणार्या
रावेरी यवतमाळ येथे होणार्या
रावेरी यवतमाळ येथे होणार्या
रावेरी यवतमाळ येथे होणार्या
कार्यक्रमपत्रिका
कार्यक्रमपत्रिका
कार्यक्रमपत्रिका http://www.baliraja.com/7-Ni येथे अपलोड केली आहे. पण काही तांत्रिक बदल अपेक्षित असल्याने दि. ५ फेब्रुवारीपर्यंत फेसबुक अथवा व्हाटसपवर शेअर करू नये. कुणाला माहिती द्यायची असल्यास लिंक द्यावी किंवा हीच पोस्ट फॉरवर्ड करावी.
तसेच पत्रिका प्रिंटिंगला गेली असल्याने आता बदलही सुचवू नयेत.
- गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण