नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पोवाडा
ऐका ऐका हो शेतकरी
तुम्ही आहात कष्टकरी
मार्ग नका धरू आत्महत्येचा
शब्द आहे काळ्या मातेचा
का घेता तुम्ही गळ्या फास..जीर हा...जी.जी.जी....
संकटावर करण्या मात
शोधण्या सुखाची वाट
उजळण्या सोन्याची पहाट
चला लढूया एकसाथ....जीर हा..जी.जी.जी....
लई सोसला रे अन्याय
आता मिळविण्या तू न्याय
कुणालाच घाबरायचं नाय
काढ रणांगणात पाय....जीर हा ..जी.जी.जी....
आहे शेवटची ही आस
नको समजूस तू भास
चालूनी आली संधी खास
आहे तूच जगाचा बॉस...जीर हा ..जी.जी.जी....
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने