नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जुनेच बुजगावणे नी गोफन व्यर्थच ठरली आहे
कळले नाही गनीम नेमके वाट त्यांनी भरली आहे
जुन्या रुढींचे जोखड वाहून काळाशी तू लढला
उभारली तू तीच कुंपणे शेती ज्यांनी चरली आहे
जगविलेस तू गद्दारांना दिली दयेची भीक सदा
आज उभा तू दारी त्यांच्या माया ज्यांची सरली आहे
भूतकाळाचे लेप न भरती आज नव्या घावांना
तीच औषधी पुन्हा पुन्हा ह्या हाताशी धरली आहे
शास्त्र भोवली अंदाजाची शेतीच्या रन मैदानी
खेळतोस तू तीच लढाई क्षणोक्षणी जी हरली आहे
धिरजकुमार ताकसांडे
हिंगणघाट, जिल्हा वर्धा.
प्रतिक्रिया
मस्त झकास
मस्त झकास धीरज साहेब. बढिया गज़ल.
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद!
धन्यवाद डॉ साहेब.
पाने