नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जोमात पीक आले पण मातले तणाने
खचतोस काय वेड्या इतक्यात संकटाने
हातात दोर बघता भयभीत बांध खचला
अन् उन्मळून पडली बाभळ तुझ्या भयाने
आता ऋतू तिन्हीही झालेत हाड वैरी
दुष्काळ जीव घेणा टपलाय संभ्रमाने
कर्जात जन्म झाला अन् फेडण्यात गेला
खाऊन तूप रोटी ते झिंगले सुखाने
तू साजरा करावा बस् फक्त बैल पोळा
ते डान्स बार बाला बघतात विस्मयाने
तू पोसलीस जनता उपसून कष्ट तेव्हा
ते चांदण्यात फिरले तू खंगला श्रमाने
बाजारभाव खाली घसरेल ऐनवेळी
ते लावतील बोली तू ऐक संयमाने
@सौ. संध्या पाटील
कराड
प्रतिक्रिया
पद्यलेखन स्पर्धा-२०१६ लेखनविभाग: गझल
पद्यलेखन स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: गझल
सौ. संध्या पाटील
कराड
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
शेतीमधल्या धगधगत्या वास्तवाचे
शेतीमधल्या धगधगत्या वास्तवाचे यतार्थ दर्शन घडवून आणणारी एक अप्रतिम गझल
शेतकरी तितुका एक एक!
पाने