नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यलेखन-स्पर्धा-२०१४
********************
शेतकरी-गीत
#######त#########
डाव मांड हा नवा ...!!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
शिवबाचा तू मर्द-मावळा, बांगड्या भरल्या कव्हा...?
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा...!!..धृ..
शिर कापले तरीही बाजी हटला नाही माघारी |
झांशीची ती राणी लढली मूत्यू दिसुनी सामोरी |
'बळीराजा'चा साज मिरविता फांस कशाला हवा..?
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा...!!..१..
मुका जीव घाबरला तेंव्हा, संताजी अन धनाजीला |
'पत्रे' ठोकून पायतळीला जेरीस आणले गो-याला |
इतिहासाचे पान इसरला, पुन्हा करी गव-गवा...
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा...!!..२..
दोन पावले मागे घेवून, शिवबा लढला जोमाने |
वाघनखाने काढी कोथळा,जीव सोडला खानाने |
मर्द-मराठ्या पळतो का रे,दिसल्याने काजवा..?
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा...!!..३..
पोलादाची छाती तुझी दणकट हे बाहू |
संकटाच्या छाताडावर निशाण रे लावू |
जीवनातूनी पळून जाता शौर्य दावशी कव्हा..?
सोड इच्यार मरणाचा रे,डाव मांड हा नवा...!!..४..
दुष्काळाच्या झळा कधी रे गारपीट आवकाळी |
महापुराचे संकट कधी तर जवार पडते काळी |
'वाघाच्या जबड्यात हात!' हा धर्म शिकविला नवा..!
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा ..!!..५..
क्रूर चेहरा ओळख आता हो सावध या वेळी |
मते मागण्या येतील वेड्या नवी टाकुनी खेळी |
दु:ख तुझे वेशीवर टांगत वाजव त्यांचा धुवां..
सोड इच्यार मरणाचा रे, डाव मांड हा नवा..!!..६..
- दिलीप वि. चारठाणकर
सेलू [परभणी ]
e-mail:-dvd1968@rediffmail.com
प्रतिक्रिया
सुरेख काव्य
सुरेख काव्य.
शेतकरी तितुका एक एक!
अभिनंदन.
रचना उत्तम आहे.स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन. http://maymrathi.blogspot.com/