Skip to main content Skip to footer
Home

Search form

User login

  • Create new account
  • Reset your password

Main menu

  • ताजे अद्यतन
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • लेखनस्पर्धा
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 8:53 PM IST, Tue January 23, 2024

Sharad Joshi

शेतकरी साहित्य चळवळ

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे

(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी

यांच्या ८८ व्या जयंतीदिनानिमित्त (३ सप्टेंबर २०२३) आयोजित 

 
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल



लेखनाचा विषय : शेतकऱ्यांचा राजा बळीराजा
 
            ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही, कदाचित असाच याचा अर्थ आहे.
 
         पण; आता शेतकर्‍यांच्या मदतीला नवीन संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील १० वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे दहावे वर्ष.
 
        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर ते १९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत बळीराजा डॉट कॉम (www.baliraja.com ) या संकेतस्थळावर विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. सर्व प्रवेशिका https://baliraja.com/spardha-2023 येथे उपलब्ध आहेत. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.

 
       शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" असा जटिल असल्याने  या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
 
         लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : मा. प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत (लातूर), मा. विवेक पटाईत (दिल्ली), मा. विनोद इंगोले (अकोला), मा. डॉ. सुरेश मोहितकर (चंद्रपूर), मा. डॉ. मीना सोसे (बुलढाणा), मा. डॉ. सिद्धार्थ तायडे (बीड), मा. शालिनी वाघ (अहमदनगर), मा. मीना नलवार (नांदेड), मा. ज्ञानेश उगले (नाशिक), मा. प्रवीण आडेकर (चंद्रपूर)


 Result

Ramram  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार  Ramram
आणि
Congrats विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!! Congrats 
  • पारितोषिकाचे स्वरूप : मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके
  • पारितोषिक वितरण :
  1. ४ आणि ५ मार्च २०२४ ला नियोजित ११ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
  2. विजेत्याला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
  3. पारितोषिक वितरण समारंभास अनुपस्थित असल्यास पोस्टाने किंवा कुरिअरने स्मृतीचिन्ह व पुस्तके पाठवली जाणार नाहीत मात्र प्रशस्तिपत्र पोस्टाने पाठवण्यासंबंधी विचार केला जाऊ शकेल.
अत्यंत महत्वाचे निवेदन :
            पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. ३१/०१/२०२४ पर्यंत आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. ज्यांनी नोंदणी केलेली असेल फक्त त्यांचे नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती  https://baliraja.com/rep-regd  येथे उपलब्ध आहे.

सहकार्याच्या अपेक्षेत!

 

आपले स्नेहांकित


 गंगाधर मुटे     राजेन्द्र फंड  
संस्थापक अध्यक्ष      स्पर्धा संयोजक  



रविंद्र दळवी   डॉ. मनीषा रिठे   मुक्तविहारी

 स्पर्धा संयोजक       स्पर्धा संयोजक        तांत्रिक सल्लागार

 
दिनांक : २४/०१/२०२४
~~~~~~~~~~~~~~~~~~
  1. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल
  2. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ : निकाल
  3. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल
  4. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल
  5. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : निकाल
  6. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल
  7. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : निकाल
  8. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल
  9. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२२ : निकाल

~~~~~~~~~~~


Attachment Size
Spardha-2023-Result.jpg 628.55 KB
साहित्य चळवळ
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6344 views

Comments (2)

हार्दीक अभिनंदन

गंगाधर मुटे

Wednesday, January 24, 2024 - 09:35
Permalink
New

Ramram  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार  Ramram

आणि

Congrats विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!! Congrats 


  • Log in or register to post comments
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३

ravindradalvi

Wednesday, January 24, 2024 - 15:37
Permalink
New

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर कवी लेखकांचे मन:पूर्वक अभिनंदन 

  • Log in or register to post comments

Search

वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

User Menu

  • माझ्या वाचनखुणा
  • My Bookmarks

User login

  • Create new account
  • Reset your password

Who's online हजर पाहुणे

There are currently 4 users online.
  • समीक्षक
  • गंगाधर मुटे
  • Arvind
  • admin
Who's new नवीन सदस्य
  • Narayan Sangale
  • Anil Ranjak Ch…
  • Sunit
  • lawateska
  • RAVICHAPKE
  • sanjaymeshram
  • डॉ. उपेंद्र बळ…
  • Subhash.patil
  • SNEHA TERDE
  • Adv Satish Borulkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    2 days ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    2 days ago
  • आता तयार व्हावे
    2 days ago
  • गंगाधरजी, "दुपट्टा घसरणे
    1 month 3 weeks ago
  • १५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
    2 months 1 week ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ