Main page content
योद्धा शेतकरी
शरद जोशींचे स्मारक : आजचा संकल्प
वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छांचा वर्षाव करून आपण माझे अभिष्टचिंतन केलेत त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. आज एकोणसाठी पूर्ण करून साठीत पदार्पण करताना आनंद व्हावा असे काहीही नसले तरी दुःख मानावे असेही काही कारण दिसत नाही. मात्र यानंतरचे उर्वरित आयुष्य दर क्षणाला वृद्धत्वाकडे वाटचाल करणारे व शारीरिक हतबलता वाढवणारे असेल इतकी जाणीव करून देणारे व आत्मभान जागवणारे नक्कीच आहे.
आता यानंतरच्या उर्वरित छोट्याशा आयुष्याचा पुरेपूर उपयोग सत्कर्मी खर्ची घालायचा असेल तर आयुष्यातील अतृप्त आकांक्षांना मूर्तरूप देण्यासाठी वेळेचा वापर काटकसरीने करण्याची नितांत आवश्यकता जाणवत आहे. त्याच अनुषंगाने एखादा संकल्प करून तो पूर्णत्वास नेण्याची भावना आजच्या दिवशी प्रखरतेने जाणवायला लागली आहे.
बरोबर ७ वर्षांपूर्वी म्हणजे २७ फेब्रुवारी २०१४ रोजी मी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची पायाभरणी करून मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा संकल्प केला होता. आणि पाहता पाहता ६ संमेलने यशस्वीपणे पार पडून सातव्या संमेलनाच्या उंबरठ्यावर शेतकरी साहित्य चळवळ उभी आहे. शेतकरी साहित्य ही संकल्पना रुजवण्यात शेतकरी साहित्य चळवळ शतप्रतिशत यशस्वी झाली आहे, याचे समाधान शब्दातीत आहे. या कार्यात आपण दिलेले सहकार्य आणि योगदानही शब्दातीतच आहे. त्या बद्दल मी आपला सर्वांचा शतशः ऋणी आहे.
वयाची साठी नव्या संकल्पासाठी :
आजच्या या शुभदिनी युगात्मा शरद जोशींचे स्मारक विदर्भात उभारण्याचा मी आणखी एक नवा संकल्प करतो आहे. कार्य अत्यंत अवघड असले तरी अशक्य कोटीतील अजिबातच नाही. मी साधारण जीव असलो तरी आपले सहकार्य साधारण नाही त्यामुळे एकमेकांचा हात हातात घेऊन अशक्य ते शक्य करून दाखवणे मुळीच अवघड नाही.
हातात हात घालुनी चालूत मित्र हो
माझ्यात तू तुझ्यात मी पाहूत मित्र हो
युगात्मा जोशींचे स्मारक म्हणजे त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करणारे आदर्श मॉडेल असेल. स्मारकाचे स्वरूप, रूपरेषा, आराखडा व नियोजन एप्रिल २०२१ मध्ये सादर केले जाईल. चला तर आज आपण सर्व मिळून संकल्प करूयात की आपल्याला एक वर्षाच्या आत आपण युगात्मा शरद जोशींच्या स्मारकाची पायाभरणी करावयाची आहे.
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत!
- गंगाधर मुटे
२७/०२/२०२१
बळीराजावरील विनोदी लेखन
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
खाते बनवा आणि लॉगिन करा
| प्रकाशन दिनांक | लेख/कविता/गझलेचे शीर्षक | वाचनसंख्या | प्रतिसाद संख्या | साहित्य प्रकार | अंतिम अद्यतन |
|---|---|---|---|---|---|
| बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ | 26,331 | 4 | रानमेवा | 4 years 3 months | |
| पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ | 44,211 | 8 | रानमेवा | 4 years 3 months | |
| पराक्रमी असा मी | 17,254 | 1 | रानमेवा | 4 years 4 months | |
| भाषेच्या गमती-जमती : भाग-२ | 13,045 | 1 | माझे गद्य लेखन | 8 years | |
| भाषेच्या गमती-जमती : भाग-१ | 11,498 | 1 | माझे गद्य लेखन | 8 years | |
| पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका | 14,395 | 5 | नागपुरी तडका | 8 years | |
| मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! | 11,221 | 3 | माझी कविता | 9 years 8 months | |
| अशीही उत्तरे-भाग- १ | 21,871 | 3 | माझे गद्य लेखन | 10 years 4 months | |
| शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) | 9,112 | 2 | माझी मराठी गझल | 12 years | |
| उद्दामपणाचा कळस - हझल | 9,018 | 2 | माझी मराठी गझल | 12 years 8 months | |
| कापला रेशमाच्या सुताने गळा | 32,394 | 1 | माझी मराठी गझल | 12 years 8 months | |
| अशीही उत्तरे-भाग-३ | 17,286 | 1 | माझे गद्य लेखन | 13 years 7 months | |
| अशीही उत्तरे-भाग - २ | 15,258 | 1 | माझे गद्य लेखन | 13 years 7 months | |
| 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत | 4,642 | 0 | माझी कविता | ||
| राखेमधे लोळतो मी (हजल) | 7,976 | 0 | माझी मराठी गझल | ||
| मग हव्या कशाला सलवारी | 10,284 | 0 | रानमेवा | ||
| छातीचं झाकण बोम्लीवर आलं | 11,378 | 0 | रानमेवा | ||
| मांसाहार जिंदाबाद ...!! | 16,629 | 0 | रानमेवा | ||
| आंब्याच्या झाडाले वांगे | 11,439 | 0 | रानमेवा |
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 43 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 11 hours 16 minutes ago
- 15 hours 1 minute ago
- 15 hours 5 minutes ago
- 15 hours 8 minutes ago
- 15 hours 9 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| पोळ्याच्या झडत्या | 218,068 |
| माझे फेसबूक स्टेटस-1 | 181,021 |
| शुभारंभ | 134,956 |
| रानमेवा - भूमिका | 109,397 |
| नागपुरी तडका - ई पुस्तक | 107,493 |
| आजचे शेतमालाचे बाजारभाव | 93,152 |
| सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता | 87,550 |
| कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! | 83,010 |
| भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा | 79,634 |
| उद्देश आणि भूमिका | 77,617 |
| विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह | 73,981 |
| विचारपूस | 71,854 |
| गणपतीची आरती ॥३५॥ | 67,878 |
| सत्कार समारंभ : वर्धा | 66,750 |
| शेतकरी संघटना लोगो, बिल्ला | 63,358 |
| किती चाटणार भारतपुत्रा? | 61,986 |
| जात्यावरची गाणी | 56,047 |
| माझे फेसबूक स्टेटस - 2 | 50,009 |
| महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात | 47,081 |
| हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। | 46,437 |
