नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कर्जबजारी बाप
(वऱ्हाडी अष्टाक्षरी )
बाप हानते तीफन
मायं उनारते खत
साठ वरस झालेना
नाई सुधरली पत
दीवा लावे तुयशीले
तेल चटनीवर नसे
बरं हुइल मनता
सालं दर साल फसे
चिंध्या झालेलं लुगळं
गाठी बांधुन असते
नवं भेटील लेन्यासं
कवा मनात नसते
बाप करते कातोळा
चिल्या पिल्याईसाठी
अन ईसरुन जाते
त्याच्या कुळत्याच्या गाठी
काया वावराची मया
तीच्या बोलीतुन येई
उन सोताचं सोसून
मले सावलीत नेई
लावगनीचा आकळा
कवा जुळतचं नाई
देनं अजुनही बाकी
कर्ज वाढतचं जाई
सावकार बॅंकवाले
बारोमासचं दारात
कसं फीटनार कर्ज
सलं सदाई उरात
✒
श्याम ठक
बार्शीटाकळी जि .अकोला
९९७५७९२५२०
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!