नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कधी जागेल सरकार
अशी कशी ही माझी शेती, कवडीमोल जातया मोती
नाही कुणाचा आधार
माझ्या शेतीचा बाजार, कधी जागेल सरकार।। धृ।।
कष्ट करूनी दिनरात काय उरतया हाती
भाव पाडुनी मालाचे अनुदान मारतया माथी
हवे कष्टाचे हो दाम नको असले हे अनुदान
नाही घेणार माघार
माझ्या शेतीचा बाजार कधी जागेल सरकार।। १।।
खर्च वाढलाय शेतीचा कर्जात पोसतो ही शेती
कवडीमोल भावात जाते रे पिकवलेले हे मोती
हृदयात सदैव घाव ओसाड झालिया गाव
कर्जातच रे संसार
माझ्या शेतीचा बाजार कधी जागेल सरकार।। २।।
आवरूनी गळ्या दोर बाप जातो रे रोज बळी
उमलण्या आधीच चिरडल्या जाते रोज कळी
मरणाची नको रे भीती आता कलम घे तू हाती
कर अन्यायावर वार
माझ्या शेतीचा बाजार कधी जागेल सरकार।। ३।।
- कृषिकवी -
रंगनाथ तालवटकर
चिखली (कोरा)
त.समुद्रपूर जि.वर्धा
7387439312
प्रतिक्रिया
सरकार कुणाचे का असेना...
सरकार कुणाचे का असेना... झोपेचे सोंग घेवून राहीले... कसे जागणार?... छान लिहिले
पाने