पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
आभास मीलनाचा..
केव्हा तरी कशाचा हलकेच भास झाला आभास मीलनाचा पळभर मनास झाला
शून्यात पाहताना हळुवार लाजली ती दृश्यात मी असावा, माझा कयास झाला
तू लांब दूरदेशी, ना रूप जाणतो मी मूर्ती मनी तरळली, कलिजा खलास झाला
पाडातल्या फ़ळांना का आस पाखरांची? येता थवे निवासा, मग मेळ खास झाला
विरहात वृक्षवल्ली निघुनी वसंत जाता बघता तया विलापा पक्षी उदास झाला
प्रेमा सदा भुकेली अभये सजीव माया निष्काम ज्या उमाळा तो प्रेमदास झाला
गंगाधर मुटे .............................. (वृत्त - आनंदकंद )
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.