पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
घुटमळते मन अधांतरी
अधांतरी घुटमळण्यामध्ये जन्म उरकला सारा खूप उभारी उडण्याची पण असुया धरतो वारा
पुसतो सदा आसवांना तो पदर भूमिचा ओला आसू पुसता हळूच पुसतो "आली जाग शिवारा?"
रांजण भरता थकतो खांदा पण तो रिताच उरतो पाणी मुरते कुठे कळेना, खेळ कसा हा न्यारा ?
मोरपिसाचे रंग लेवुनी, ढगांस तू उधळावे ढगाळुनी या काळजासही यावा भावपिसारा
शब्दामध्ये परके शब्द बेमालूम ते घुसती मायबोलीच्या सुंदरतेला काळिमा तो सारा
कालपरत्वे अनहित बुद्धी, तोल तरी ना जावा मानवतेचा पाठपुरावा अभये अंगीकारा
गंगाधर मुटे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.