पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
भक्तीविभोर....!!
चंद्रास ग्रासताना अंधार घोर झाला संधी चिकार येता तारा मुजोर झाला
आमंत्रणे मिळाली त्या सर्व मूषकांना पंक्तीस साह्य व्हावे बोक्यास पोर झाला
आता दह्यादुधाला कान्हा नशीब नाही हंडी कवेत ज्यांच्या बाहूत जोर झाला
टाळूवरील लोणी खायांस गुंतला जो सत्कार पात्र तोची मशहूर थोर झाला
प्रेमात वारसाच्या स्वहिता भुलून गेला नात्यास भार होता स्वजनात चोर झाला
यावे तसेच जावे ना अभयदान कोणा मृत्यू समीप येता भक्तीविभोर झाला
गंगाधर मुटे ..................................................... (वृत्त - आनंदकंद )
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.