नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर भारतामध्ये फक्त सरकारी नौकरदार व सत्तेमद्धे आलेले नेतेमंडळी आपले भले करण्यात गुंग आहे . कोणतेही निर्णय फक्त आपल्याच साठी घेत असतात. त्यामुळे कष्टकरी वर्ग पार निराश झालेला आहे.हे आत्ताच आलेल्या भाजप प्रणीत मोदींच्या सरकार कडून समजायला येत आहे . त्यामुळे कष्टकरी वर्गाला आता कसल्याही प्रकारची उम्मीद, कोणत्याही पक्षांच्या सरकरांकडून राहिलेली नाही.
सरकारी नौकरांची पगारवाढ , पेन्शनवाढ, महागाई बरोबर वाढत असतात . परंतु शारीरिक श्रम करणारा असो, की कारखान्यामध्ये काम करणारा असो, घर बंधणारा मजूर असो, की रस्ते बांधणारा मजूर असो , की एकंदरीत शरीरश्रम करणारा कुणीही असो. सर्वांची दुखे सारखीच, त्यांच्यासाठी हिताचे निर्णय कोणतेही सरकार घेत नाही . त्यामुळे कितीही महागाई वाढली तरी त्यांचे उत्पन्न जैसेथेच असते. नात्यांना धड खायला सकस अन्न मिळत की , डोक्यावर सुरक्षित छत मिळत . बिमार पडला की , योग्य औषध घेऊ शकत नाही. की आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे पिढ्यान पिढ्या आम्हाला शरीर कष्ट करण्या शिवाय पर्याय उरत नाही . आणि हे सगळं काही हेतु पूरस्सरच केल्या जात आहे.
"सोन्याला कितीही भाव असला तरी, अन्नाचे काम सोनं करू शकत नाही , त्यामुळे अन्न हे अनमोल असला हवं ." कारण त्यामुळे संपूर्ण मानवांची भूक भागते . तरीही पण या अन्न पिकविणार्या कष्टकरी शेतकर्याला न शेतमजुरला एका सरकारी चपरासी व करकुणा इतकी सुद्धा इज्जत मिळत नाही .
वेळ प्रसंगी सरकारी कामानिमित्त संबंधित कार्यामध्ये जर एखादा शेतकरी गेला तर , त्याला एखादा चपरशाला सुद्धा साहेब म्हणावे लागते. परंतु तोच चपराशी मात्र एखाद्या साहेबा सारखा ताव खात असतो . आपल्या पेक्षा वयाने मोठा जरि असला तरी त्याला आरे , कारे म्हणून एकेरी भाषेत बोलतो. ही परिस्थिति आमच्या सरकारनी करून ठेवली आहे. कारण सरकारच्या वेतनवाढी मुळे शेफारून गेली आहे . आणि म्हणून कष्ट करणार्याला कसलीही इज्जत राहिलेली नाही .
जोपर्यंत श्रमला प्रतिष्ठा मिळत नाही , तोपर्यंत श्रम करणार्याला महत्व येणार नाही. तो पर्यन्त शरीर श्रम करणार्याला सुख समृद्धि प्राप्त होणार नाही , हेच खरे .
" शरीरकाष्टाला मोल नाही, फोडणीला तेल नाही
मिरच्याचे फोल नाही, कष्टकर्याच्या भाकरीला "