पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
वाघास दात नाही
गायीस अभय देण्या, वाघास दात नाही रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही
फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळीची एका स्वरात गाणे, साथीत गात नाही
रंगात तू गुलाबी, रूपात का भुलावे वांग्या तुझ्या चवीला, मुंगूस खात नाही
खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ? प्राशू नको विषा रे, देहास कात नाही
अभयात वाढलेली, वाचाळ राजसत्ता राजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.
गंगाधर मुटे ........................................................ (वृत्त - आनंदकंद ) ..................................................................
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.