नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कवा हासू कवा रडू
तुह्य माह्य असं जगणं मातीच्या कुशित
कवा हासू कवा रडू जगू डोये पुशित ||ध्रृ.||
पाखरे येती अशी पाखरे जाती
सुखा-दुखाचे वारे चौफेर घुमती
हिरव्या पिकांना घेवू आपुल्या कुशित
कवा हासू कवा रडू जगू डोये पुशित ||१||
आला आषाढ इथे आला श्रावण
वसंताने केला मळा फुलांनी पावण
शिशिराचा काय दोष त्याचं ढळण कुशित
कवा हासू कवा रडू जगू डोये पुशित ||२||
असा मांडव उभा अस्मानी मोठा
भुईच अंगण बाई हा सानुला गोठा
नक्षत्र जाईल असे येईल चांदण्या खुशित
कवा हासू कवा रडू जगू डोये पुशित || ३||
दुष्काळी ताप असा अजून सोसाचा
एकमेका आपण दोघे धीर द्यायाचा
ह्या भुईनं शिकवलं असं जगण खुशित
कवा हासू कवा रडू जगू डोये पुशित.||४||
-आशिष वरघणे
रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
पिन. ४४२३०१
मो. ९६३७८१३५०६
प्रतिक्रिया
छान
छानच
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!