Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.

none
बुडत्याला आधार कर्जाचा?

लेखनविभाग: 
ललितलेख

मी काही शैक्षणिक कारणास्तव गावपासून दूर आहे पण मातीशी, गावाशी असलेले नाते घट्ट आहे जसे माय लेकराचे असते अगदी तसेच. गावातील मनमोकळेपणाने बोलणारी माणसं, बहरलेले झाडे-वेली, पशु-पक्षी, ओढे, झरे, गाई-गुरे अशी निसर्गरम्य पण तितकीच जोखमीचं वातावरण मनाला स्पर्शून जाते. साहजिकच मातीशी नाळ जुळलेली असल्यामुळे मित्रही मातीशी नाते असणारे बरेच आहेत. अचानक मोबाईलचा कर्कश आवाज आला अन मी मोबाईल हातात घेऊन चाचपडत बसलो तोच गावातल्या एका मित्राचा संदेश प्राप्त झाला. मजकूर वाचू लागलो तसे डोळे पाणावले समोर मोबाईल तसाच ठेवला अन विचारात गुरफटलो गेलो, तोपर्यंत एक मित्र आला आणि म्हणाला काय झाले? त्याला काहीही न बोलता गावाकडे निघण्याची तयारी केली. असं तडफडकी चाललो तर आणखी काही मित्र म्हणाले की काय झाले मी त्यांना सांगितले गावाकडे अगदी जवळच्या मित्राने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो फार प्रामाणिक आहे, कष्टाळू आणि त्याचं नुकतंच दोन वर्षे अगोदर लग्न झालंय. मी तयारी पूर्ण करण्यात गुंतलो असताच त्यातला कुणीतरी एकजण म्हणाला असेल काही तरी मुलीच्या प्रेमापोटी किंवा नशेत स्टंटबाजी करण्याच्या नादात असेल, त्यावर फुटकळ काहीही न बोलता मी चालता झालो. गावाकडे पोहचलो घराकडे निघालो सरळ वाटेत कुणालाही काहिही न बोलता घरी बॅग ठेवली कुणालाही न सांगता, न कळवता आलो होतो त्यामुळे सगळे घरातील सदस्य विचारायला लागले अचानक कस काय त्यावर काहीही न बोलता त्यांना सांगितलं येतो एकदा गावातून. थेट त्या मित्राच्या घराकडे वाट धरली. संध्याकाळची वेळ रस्त्याने गाई-गुरे, शेतातली कष्टकरी घराकडं परतत होते वाटेने कुणीही भेटला की रामराम घडायचा पण मी चर्चा न करता झपाझप पाउल टाकत त्याच्या घरी गेलो. त्याला बघितल्या बरोबर डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या तोही म्हणाला मित्रा फार मोठी चुकी झाली. त्याची तब्येत अत्यंत खालावली होती अजूनही त्याच्या डोळ्यात पाणी अन भीतीने ग्रासलेला चेहरा बघून त्याच्या वेदनेची दाहकता लक्षात आली मी त्याला धीर दिला अन विश्वासात घेतले अन विचारलं काय बरं एवढ मोठं पाऊल तू उचललं. त्यावर तो उत्तरला मित्रा अगोदरच बँकेचे कर्ज आहे अन पुन्हा मागच्या हंगामात शेतीच्या मशागतीसाठी, औषध-खतासाठी अन घरखर्चास व्याजाने एका माणसाकडून काही रक्कम आणली होती हंगाम संपल्यानंतर फेडीन म्हनलं त्याल पण हंगाम फारसा हाती नाही लागला आलेली रक्कम व्याज फेडण्यातच गेली कर्ज तसंच बोकांडी आता पुढचे दिवस कसे काढणार या प्रश्नाने पुरता घायाळ होऊन गेलो होतो अन त्यात हे असं पाउल उचलल्या गेलं, फार चुकी झाली. त्यांनंतर बऱ्याच वेळ त्याच्या घरच्यांशी बोलणं झालं. निघता निघता त्याच्या हातात माझ्याकडील रक्कम दिली पण त्याने स्वीकार करायला मनाई केली त्यावर त्याला समजावलं हक्कानं मित्र म्हणुन ठेव सावकार म्हणून नाही त्यावर त्यानं स्मितहास्य केलं जणू झाडाला फुलं उमलतात. बराच वेळ झाला आणि मी घराकडे निघालो, वाटेत चालता-चालता मित्रांच्या बोलण्याचं अत्यंत वाईट वाटले अन फार चीड येत होती त्यांची. कुणालाही मुलींच्या प्रेमाचं कारण लावतात, मातीवर प्रेम करतांनाहीं अशी परिस्थिती उदभवते हे अद्याप त्यांना माहीतच नसेल. यासंदर्भाने कवी दासू वैद्य यांच्या कवितेच्या ओळी फार काही सांगून जातात
" गळा दाबल्याने, गाणे अडते का?
वाढलेल्या काजळीने, ज्योत विझते का? "
दासुंनी विचारलेला प्रश्न मला विचार करायला भाग पाडतोच. घरातला कर्ताधर्ता आत्महत्या करतोय तर त्याच्यावरची जबाबदारी संपल्यासारखी वाटते पण मागे कुटुंबाचे काय? त्यांना कर्जात माखलेला का होईना वडील, मुलगा, नवरा अशा अनेक भूमिका पार पाडणारा घराचा कर्ताधर्ता तर हवाच आहे ना? गाय मरणं वाईटच पण त्यातही दुभती गाय मरणं अधिक त्रासदायक असतं.

Share

प्रतिक्रिया