नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नाही शेतमाला भाव
वस्तुनिर्माता मालक
ठरवितो तिचा भाव,
अपवाद एकमात्र
त्याचे शेतकरी नाव.
काढी कंदं फळं फुले
तेलबिया अन्नधान्य,
नेतो विकाया बाजारी
भाव ठरविती अन्य.
जाई पहाटे शिवारी
शेतातच होई संध्या,
जरी पिकवी कापूस
अंगी पांघरतो चिंध्या.
एका दाण्याचे हजार
दाणे राबुनिया करी,
दुष्ट दलाल व्यापारी
सुृरा मानेवर धरी.
अन्नदात्या किसानाच्या
होतो मालाचा हर्रास,
म्हणे जगाचा पोशिंदा
भाळी ठरलेला फास.
वाटे आतातरी इथे
व्हावा चांगला उठाव,
बेईमान शासनाच्या
पडो वर्मावरी घाव.
.................................
खुशाल गुल्हाने,
गोकुळ काॅलनी, साईनगर,अमरावती-४४४६०७
भ्रमणध्वनी : ९४०३०१९७९५
प्रतिक्रिया
सुंदर कविता
सुंदर कविता
पाने