पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
पुढे चला रे....
चेतलेल्या तेलवाती शांत नाही चालताना वाट ही विश्रांत नाही
नेमलेले लक्ष्य आवाक्यात आहे ना तमा वा सावजाची भ्रांत नाही
वेदनांची पायमल्ली फार झाली झुंज शौर्याने अर्जी आकांत नाही
आजमावुन एकदा घे तू लढाई सोक्षमोक्षाविन अता मध्यांत नाही
घे भरूनी पोतडी दोन्ही कराने हा विरक्ती साधकांचा प्रांत नाही
गंगाधर मुटे ........................................... (वृत्त - मंजुघोषा) .................................................................. (रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.