Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



कोरोना :शेती व्यवस्था परिवर्तनाचा जनक!

लेखनविभाग: 
वैचारिक लेख

कोरोना: शेती व्यवस्था परिवर्तनाचा जनक !
डॉ.आदिनाथ ताकटे
मृदशास्त्रज्ञ
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,जि. अहमदनगर
भ्रमणध्वनी क्रमांक:९४०४०३२२८९
-------------------------------------------------------------------------------------------------------------
ढासळणारया भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना महामारीच्या संकटात कृषि क्षेत्राने काही प्रमाणात सावरले यात शंकाच नाही.आजमितीला एकूण लोकसंखेच्या ४८ टक्के लोक रोजगारांसाठी शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत.या ४८ टक्के लोकसंखेच्या,राष्ट्राच्या सकळ उत्पन्नात (जीडीपी मध्ये) १७ टक्के वाटा आहे.कोरोनामुळे आधीच अधू झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत उणे २३ असा घसरलेला जीडीपी जेंव्हा सगळ्याच क्षेत्रात गडबडत असताना,शेती क्षेत्रात मात्र ३.५ टक्क्यांनी वाढला आहे.पाऊसमान चांगले राहिल्यास आणि निसर्गाने साथ दिल्यास यात वाढ होण्याचा अंदाज आहे.
देशात गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पिकांच्या क्षेत्रात सुमारे सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.भाताचे लागवड क्षेत्र १०, डाळवर्गीय ९, तेलवर्गीय पिकांचे १३ तर कापसाचे ३ टक्क्यांनी वाढले आहे.ही स्थिती पहाता कोरोनाच्या संकटकाळातही शेतकऱ्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे.
कोरोना संकटामुळे देशासाठी कृषि क्षेत्राची असलेली अनिवार्यता ठसठशीतपणे समोर आली आहे.तसेच गर्तेतील अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी कृषि क्षेत्राच्या सुप्त क्षमतांचा वापर करणारी व्यूहरचना करावी लागणार आहे..कोरोना संकटाचा जगाच्या आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम गंभीर असून कृषि क्षेत्र हाच त्यावरील रामबाण उपाय ठरू शकतो.गेल्या काही दशकांमध्ये तयार होत गेलेल्या धान्य साठ्यामुळे आज आपण या संकटाला खंबीरपणे तोंड देऊ शकलो.हे सर्व शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे सहज शक्य झाले.
देशाच्या उत्पन्नात शेतीचा वाटा तर मोठा आहेच पण कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्यांनी देश जगवला हे अंतिम सत्य आहे.कोरोनाच्या महामारीत घरापर्यंत धान्य, भाजीपाला आला.सॅनिटायझरचे अल्कोहोल शेतातून आले.मास्कचा कापूस शेतातून आला व देशाची अर्थव्यवस्था सावरायला हाथभार लावणारे मद्य शेतकऱ्यांच्या ऊस–द्राक्षापासून आले हे मान्यच करावे लागेल.
कोरोना लॉकडाऊन काळात उदयोग-व्यवसाय ठप्प झाल्याने सर्वसामान्यांपासून ते संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था मंदावल्याचे दिसतच होते.त्याला आता अधिकृत आकडेवारीची पृष्टी मिळाली आहे.एप्रिल ते जून या काळात “घरीच रहा,स्वस्थ रहा” असे सरकारकडून सांगितले जात होते.देशातील बहुतांश जनतेने ते ऐकलेही! परंतु याचा काळात देशाची अर्थव्यवस्था गंभीर आजारी होऊन मरणासन्न अवस्थेला पोचली.प्रदीर्घ अशा लॉकडाऊन काळात कोरोनाचा कहर थांबलेला नसून रुग्णसंख्येत आपण आता अव्वल स्थानी पोचलो आहोत.अर्थात आपल्या देशासाठी सर्वागाने हा अनर्थ काळच म्हणावा लागेल.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वेळा आर्थिक मंदीने देशाला ग्रासले आहे.परंतु एकूण देशांतर्गत उत्पादनवाढीच्या दरात एवढी मोठी घसरण प्रथमच झाली आहे. बांधकाम, उदयोग,उत्पादन आणि सेवा अशा सर्वच क्षेत्रात अत्यंत वाईट अवस्था आहे.या क्षेत्रातील जीडीपीतील घसरण २० ते ५० टक्केपर्यंत आहे.असे असताना थोडीफार दिलासदायक बाब म्हणजे कोरोना संकटकाळातही शेती क्षेत्रात मात्र ३.४ टक्के वाढ दिसून येते. अर्थचक्र रसातळाला जात असताना हे वास्तव स्वीकारून ते सुधारण्याचे प्रयत्न करण्याऐवजी प्रगती, विकास, आर्थिक महासत्ता, आत्मनिर्भरता अशी खोटी स्वप्ने देशातील जनतेला दाखवली जात आहे.
लॉकडाऊन मध्ये अनेकांचा रोजगार गेला,नोकऱ्या गेल्या,व्यवसायात बुडाले,त्यामुळे सर्वसामान्यांच्या हाती पैसा नसल्याने भयावह आर्थिक मंदीचा सामना देशाला करावा लागत आहे. सर्वसामान्यांच्या हाती थेट पैसा येईल अशा उपाययोजना अजूनही शासन पातळीवर अवलंबविल्या जात नाहीत.त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता येऊन मार्केट सुरु होत असले तरी उत्पादनांना मागणी नाही. अशावेळी शहरी आणि ग्रामीण अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील. आत्तापर्यंतच्या सर्वच आर्थिक मंदीत शेती क्षेत्राने देशाला सावरले असताना त्यापासून राज्यकर्ते काहीही बोध घ्यायला तयार नाहीत.कोरोना संकटकाळात शेतीकडे शासनाने दुर्लक्ष करूनही शेतकऱ्यांनी शेतीची पडझड होऊ दिली नाही.त्यास निसर्गाचीही साथ लाभली आहे.
कोरोनाच्या संकटात कभी कभी खुशी कभी गम:
गेली सात महिने कोरोनाने शहरी भागाला मारलेली मिठी अजूनही सैल होण्याचे नाव घेत नाही मात्र याच कोरोनाने ग्रामीण भागात शेती आणि शेतकऱ्यांना मजबूत करण्या बरोबरच स्वावलंबनाचे धडेही दिले आहेत.
कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचे अनेक प्रकारे नुकसान झाले.टोळधाडीचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी जाणवला.रब्बी हंगाम संपत आला असताना फळांची काढणी, काही प्रमाणात झाली असल्याने मोठी हानी झाली नाही.परंतु फळांची स्थानिक बाजारात विक्री झाली नाही तसेच निर्यातीची सोय नसल्याने शेतकऱ्यांना बराच माल मातीमोल भावात विकावा लागला.बरचसा माल अक्षरशः तसाच सोडून द्यावा लागला.आपल्या देशात २८ लाख टन मका पिकतो. त्यापैकी दोन तृतीयांश मका पोल्ट्रीसाठी खाद्य म्हणून वापरला जातो.परंतु कोरोनाचा पोल्ट्री उद्योगाला दणका बसल्याने मक्याची किंमत घसरली.द्राक्षाची निर्यात व स्थानिक बाजारपेठ न मिळाल्याने,यंदाच्या वर्षी मोठया प्रमाणात बेदाण्याचे उत्पन्न झालेले आहे. भाजीपाला तसेच खरबूज,कलिंगड,आंबा अशा उत्पादनाच्या विक्रीची सोय नसल्याने शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक फटका बसला.
अडचणी देखील कधी कधी व्यवसायिक संधी निर्माण करतात हा विश्वास रुजविण्यात राज्यातील बह्तांश शेतकारी उत्पादक कंपन्या यशस्वी ठरल्या आहेत.लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या समस्यावर मात करीत कंपनीच्या सभासदांनी नाशवंत भाजीपाला,फळे विक्रीचा प्रश्न निर्माण झाला त्यावर उपाय म्हणून शहरातील विविध भागात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री हा पर्याय उपलब्ध करून दिला.यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फायदा झालाच तसेच ग्राहकाला वाजवी दर मिळून तो हि समाधानी झाला आहे. राज्यात जवळ जवळ २०० शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. परतू त्यातील मोजक्याच संस्था या कार्यक्षम आहेत त्यांना चालना देणे क्रमप्राप्त आहे.राज्यातील कृषी विभागाच्या नियंत्रणात शेतकरी गटाच्या सहभागातून थेट विक्री करिता पाठबळ देणे हितकारक ठरेल.
प्रत्येक आपत्ती काहीतरी संधी घेऊन येते,त्याच प्रमाणे लॉकडाऊन काळात शेतकर्यानी डीजीटल मार्केटिंगचा वापर करून शेती व्यवसायाला नव स्वरूप प्राप्त करून दिल. शेतीला व्यवसाय बनविताना शेतीमाल पुरवठ्यात सातत्य,दर्जा व सुरक्षितता सांभाळली तर शहरातील ग्राहकांची गरज लक्षात घेऊन काळजीपूर्वक व्यवसाय केले तर पुढील दोन दशके शेतीचे असतील. कोरोना संकट काळात डीजीटल माध्यमाचा वापर खूप फायदेशीर राहीला.सोशल मीडियाचा वापर करून (Whatsup) राज्यातील बहुतेक कलिंगड/खरबूज उत्पादकांनी थेट विक्रीतून नेहमीपेक्षा दुप्पट पैसे मिळाले तसेच ग्राहकांना स्वतः दरात ताजा माल मिळाला.
भारताची अर्थव्यवस्था बळकट करावयाची असेल तर शेतीला व्यवसायाचे स्वरूप देणे क्रम प्राप्त आहे. पारंपारिक शेतीला फाटा देऊन,आधुनिकतेकडे वळण्यासाठी शेतीतील गुंतवणूक वाढावयास हवी, तरच आपण या करोनामुळे उदभवलेल्या आर्थिक संकटावर मात करू शकू.शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री व्यवस्था बळकट करणे अंत्यत महत्वाचे आहे.त्यासाठी रसायन अवशेष मुक्त शेतमाल उत्पादनाचे तंत्र आत्मसात करावे लागेल.उपलब्ध साधन सामुग्रीच्या संतुलित वापर करून नफा गुणोत्तर वाढवावा लागेल.सध्या कोरोनामुळे उद्योग आणि पुरवठा साखळी समोर मोठे आव्हान उभे राहिले असले तरी या साथीमुळे देशांतर्गत अन्नसुरक्षेचे महत्व अधोरेखित झाले आहे.तसेच देशासाठी धान्य उत्पादकांचे अत्यावश्यक काम करणाऱ्या शेतकऱ्याबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण झाली आहे.
तज्ञाच्या मते कोरोनाचे संकटाचे आर्थिक परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतील.लॉकडाऊन-अनलॉक या विविध उपाय योजनांचा शेती क्षेत्रावर प्रचंड परिणाम झाला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरचा टप्पा शेती व्यवसायाला सावरण्याच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात कृषि क्षेत्रात डिजिटल माध्यमांचा वापर वाढला.शेतकऱ्यांच्या ऑनलाईन बैठका, वेबिणार, फेसबुक, यूटूब, झूम या सारख्या अॅपवर चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना ऐकायला मिळत आहे.या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना वेळ होता त्यामुळे प्रतिसादही मोठया प्रमाणात मिळाला.या माध्यमातून शेतमाल विक्री व्यवहाराच्या नवीन पद्धती, वाहतुकीची विविध माध्यमे,विविध जिल्ह्यातील शेतीमालाचे दर आदींची माहिती शेतकऱ्यांना मिळू लागली. शहरातील मार्केटमध्ये शेतीमालाची चढ्या दराने विक्री व्हायची,परंतु शेतकऱ्यांच्या पदरात मात्र अधिक दर मिळत नव्हता.तो आता बऱ्यापैकी वाढला आहे. एक वेगळी संधी या कोरोनाच्या निमित्ताने निर्माण झाली.बरचसे कृषि पदवीधर पॅकिंग,ग्रेडिंग करून माल पाठवू लागली आहेत स्वत:चे ब्रॅन्ड निर्माण करण्यात यशस्वी आले आहेत.मोबाईलच्या वेगवेगळ्या अॅप्स मधून ग्रेडिंग, पॅकिंग, गुणवत्ता, खतांचे व्यवस्थापन,जमिनीचे आरोग्य, कीटकनाशके, बुरशीनाशके, पाणी व्यवस्थापन,पिकांची संपूर्ण माहिती,याच बरोबर कृषि क्षेत्रातील विविध सेवांबद्दल माहिती मिळत असल्याने शेतकरी जागरूक झाला आहे.पिकांची उत्पादकता आणि प्रत सुधारण्याचे अनेक मार्ग त्याला नवीन तंत्रज्ञानामुळे समजू शकले.
कोरोना विषाणूचा प्रसार आता ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे.देशाच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेत ताठ मानेने उभ्या राहिलेल्या कृषि क्षेत्रासमोर नव्याने संकट येऊ घातले आहे.यात सुधारणा झाली नाही आणि स्थानिक स्तरावर अघोषित लॉकडाऊन सदृश परिस्थिती निर्माण होत गेली तर पुरवठा साखळी मध्ये परत एकदा एप्रिल-मे सारखी स्थिती निर्माण होईल.त्यामुळे जिन्नसाच्या किमती किरकोळ बाजारात वाढून त्याचा उत्पादकांना फायदा होऊ शकेल.ग्रामीण भागातील स्थानिक लॉकडाऊन अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास अडचणीचे ठरत आहेत आणि पुढील तीन महिने तरी अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चित राहील असे दिसत आहे.
जर कृषि क्षेत्राचा अर्थवृद्धी दर ढासळला असता तर बहुसंख्य लोकांच्या हातातील खरेदीशक्ती आणखी कमी झाली असती आणि अर्थ व्यवस्था आणखी वाईट अवस्थेत गेली असती.कृषि क्षेत्राने भारतीय अवस्थेला कोरोनाच्या संकटात काही प्रमाणात सावरले असच म्हणाव लागेल. या पार्श्वभूमीवर सरकारने आता खरीपाच्या पिकांचे भाव कोसळणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. तसे झाले तरच ग्रामीण अर्थकारणात पैसा जाईल आणि अर्थव्यवस्थेत मागणी तयार होईल.प्रश्न असा आहे कि सरकार हे कसं करणार? हमीभाव जाहीर करावयाचे पण प्रत्यक्षात त्या भावाच्या खाली शेतकऱ्यांना माल विकावा लागू नये यासाठी काहीच करायचे नाही.अशीच सरकारची नीती राहिली आहे. अर्थव्यवस्थेत मागणी वाढवायची असेल तर सरकारला एक तर हमिभावाने खरेदी करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागेल किंवा लोकांच्या हातात थेटपणे पैसा देण्याचे मार्ग अवलंबवावे लागतील.यातून लोकांची क्रयशक्ती वाढीस लागेल आणि शेतमालासह सर्वच उत्पादनांची मागणी वाढेल.जगभरच्या अनेक लोकशाही देशात कोरोनाच्या काळात तेथील लोकांच्या हातात थेटपणे रोख रक्कम देण्याचे मार्ग अवलंबविण्यात आले आहेत.याचा परिणाम असा झाला कि तेथील सामान्य जनतेला आपल्या किमान गरजा सहज भागवता आल्या. अर्थव्यवस्थेतील मागणी देखील काही प्रमाणात सावरता आली.अशा तऱ्हेच्या योजना आल्या नाहीत तर शेतीमालाचे भाव कमी राहण्याचा धोका देखील संभवतो आहे.आज बांधकाम क्षेत्र कमालीचे थंडावलेले आहेत, त्यामुळे कृषि क्षेत्रावरील लोकसंख्येचा बोजा आणखी वाढला आहे.या पार्श्वभूमीवर तर कृषि क्षेत्राला मदत करणे आणखीनच आवश्यक झाले आहे.सध्याच्या महामंदीतून देशाला बाहेर काढावयाचे असेल तर सर्वसामान्यांना थेट आर्थिक मदत करावी लागेल,शिवाय शेती,उदयोग व्यवसाय,सेवा अशा सर्वच क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी लागेल. लोकांचे उत्पन्न वाढले कि बाजारात चैतन्य निर्माण होऊन अर्थव्यवस्था सुधारेल.
कोरोनाने माणूस झाला शहाणा!:
थाळ्या वाजवून आणि मेणबत्त्या पेटवून कोरोनाचे संकट काही केल्या जात नाही हे आता सिध्द झाले आहे.कोरोनाने बिनकामाचे भटकणे थांबवले,खर्चाला कात्री लावली.स्वच्छता जगण्याचा भाग बनली. माणसालात्या ने सावधान केले आणि सांगितले गाफील राहू नका, मेजवाण्या, मैफिली, गर्दी, जत्रा, प्रवास, ढाबे, हॉटेल, सहल, अवाढव्य विवाहसोहळे, त्यातील महाप्रचंड उधळण या सर्व घडामोडींना कोरोनाने लॉक लावले.त्रास झाला मात्रा उधळमाधळ थांबली आणि मौजमजेला बंधन पडले.ज्यांच्याकडे घरभर पैसा होता,आहे अशा लोकांचे चंगळ करण्याचे दिवस लॉक झाले. हातावर पोट असणारे मात्र हैराण झाले,आता कुठे त्यांची गाडी रुळावर येऊ पाहत आहे,परंतु कोरोनाचा कहर शहरी भागाबरोबरच, ग्रामीण भागातही मोठया प्रमाणात पाय पसरत आहे.कोरोनाने उतू नको, मातु नको,घेतला वसा टाकू नको अशीही ही शिकवण दिली.मिजास मिरवणारे जमिनीवर आले.सगळ्यांना जगण्यातील किंमत कळाली.खोटे अहंकार करपून गेले.भान आले आणि भविष्यातही कसे वागावे याबद्दलचे नवीन शहाणपण कोरोना शिकवून गेला.लग्न या महाउत्सवी आणि प्रचंड उधळमाधळ होणाऱ्या समारंभाला जबरदस्त चाप बसला.एकमेकांचे अनुकरण करण्यापायी,खोट्या प्रतिष्ठेपायी लग्नाच्या नावाखाली लक्षावधी कुटुंबे हैराण आणि कंगाल झाली हे जळजळीत सत्य आहे.संकटाने एक लग्न आणि पन्नास माणसे हे नवीन समीकरण जन्माला आले. साधेपणाचे शहाणपण यातून मिळाले.कोरोना काळात नियम आणि कायद्याने हा डामडौल थांबवला हे एका अर्थी छानच झाले.मानपमान,पैसा वाचला.नाहक प्रतिष्ठेचा टेंभा मिरवत कित्येक कुटुंबे कंगालीमध्ये डुबून गेली.संकटामध्ये शहाणपणाची बीज असतात.प्रत्येक गोष्टीवर इलाज असतो, औषध असते हे भान संकटाने शिकवले. सावधानतेचा धडा मिळाला.या संकटाने माणुसकीची-सेवेची नव्याने स्थापना केली.कोरोना संकटात शहाणपणाची बीजे रोवली गेली.
संपूर्ण क्रांती, समाज परिवर्तन, व्यवस्था बदल अशी नानाविध स्वप्ने अनेकांनी आजवर बघून परिवर्तनासाठी चळवळी उभारल्या होत्या. चळवळी संपल्या पण परिवर्तनाची स्वप्ने केवळ स्वप्नेच उरली होती; तीच स्वप्ने करोना प्रत्यक्षात उतरवण्याची शक्यता आहे. जुने मोडकळीस आल्याशिवाय आणि जुने मोडून सपाट झाल्याशिवाय नवनिर्मितीचा पाया रचता येत नाही. जुनी व्यवस्था मोडकळीस आणण्याची क्षमता कोणत्याच चळवळीला दाखवता न आल्याने व्यवस्था बदल होण्याऐवजी केवळ जुन्याच व्यवस्थेची थोडीफार डागडुजी होण्याइतपच यश सर्व क्रांतिवादी चळवळींना मिळालेले होते. पण जुनी व्यवस्था मोडकळीस आणण्याचीच नव्हे तर पार नेस्तनाबूत करून टाकण्याची क्षमता करोनामध्ये आहे, इतके मात्र आजही स्पष्ट दिसते आहे. माणसाच्या येरेगबाळेपणामुळे जर करोनाला पूर्णशक्तीनीशी लीला करण्याची संधी मिळाली तर व्यवस्था परिवर्तनाचा जनक ठरण्याची पुरेपूर क्षमता करोनात नक्कीच आहे.!
माझाच माणूस मला मरताना पहाता येत नाही,अशी महाकठीण स्थिती या कोरोना महामारीने निर्माण केली आहे.म्हणून जोवर आहे तोवर छान जगून घ्या हाच धडा या निमित्त अधिकच कोरला जातोय मनावर!
मात्र हे दिवस निघून जातील, धीर धरू, एकमेकांची काळजी घेवू, सावधान रहात आणि नियम पाळत आपण कामे करत राहू. थांबला तो संपला ! अशा संकटाकडे उदार मनाने बघुया आणि आयुष्याची वाट चालत राहू या!
धन्यवाद!
---------------------------------------------------------------------------------------------
(या लेखात संदर्भासाठी काही लेखकांच्या लेख, वृत्तपत्रातील आकडेवारीचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या सर्वांचे आभार)
लेखक:डॉ.आदिनाथताकटे,
मृदशास्त्रज्ञ,
महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी,अहमदनगर,
मो.९४०४०३२३८९

Share

प्रतिक्रिया