|| कोरोना माहात्म्य-16 ||
आज मी पण कोरोना पॉझिटिव्ह आलोच.
दिनांक : २३ एप्रिल 2२०२१
आज सकाळी आंघोळीनंतर ७ वाजता थंडी वाजून ताप येणार असे जाणवायला लागले. थोड्याच वेळात शरीरात तापाने रंग भरायला सुरुवात केली आणि थंडी वाजून तापाचे आगमन झाले. लगेच पॅरासिटोमॉल गोळी घेतली. ताप ओसरला. परत दुपारी 1 गोळी घेतली.
सायंकाळी परत थंडी वाजून ताप येणार असल्याचे जाणवायला लागले… मोघम लक्षणे व तपशील असा.
१) हलकी थंडी वाजून तापाची सुरुवात पण साध्या गोळीने काही काळासाठी थांबला. मला ही लक्षणे हिवतापाची वाटली.
२) मध्यम अंगदुखी
३) नाकाचा वास व तोंडाची चव कायम आहे.
४) सरासरी 58 सेकंद श्वास रोखून धरू शकतो.
५) शुगर पोस्ट मिल 200
६) बीपी 126/73
७) मी गेली वर्षभर नियमितपणे 20 मिनिटे कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रस्तिका व भ्रामरी प्राणायम करतो.
यापुढेही सुरू असणार आहे.
८) आजपासून कोरोनील सुरू केलंय.
९) कोविशील्डचा पहिला डोज 31 मार्च 2021 ला घेतला आहे.
डॉक्टर भारशंकर यांच्या सल्ल्यानुसार cbc टेस्ट केली. टेस्ट एकदम नॉर्मल आली
पण
कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मी कुठे गेलो नाही पण लोकांनीच कोरोना माझ्यापर्यंत घरपोच आणून पोचवला.
१) मी लवकर कोरोना निगेटीव्ह होईल चिंता नसावी.
२) मन प्रसन्न होईल, वाचताना - लिहिताना आंनद होईल असेच लिहिणार आहे. डोकेदुखी होईल असे काहीही मी पुढील काही दिवस लिहिणार-वाचणार नाही. व्हाट्सऍपचा वापर सुद्धा मर्यादित असणार आहे.
कोरोनाच्या निमित्ताने निदान काही दिवस तरी मस्तपैकी आनंददायक जीवन जगता येईल.
कळावे,
- गंगाधर मुटे
==============
दिनांक : 24 एप्रिल 2021 : रात्री 7.30 नंतर
१) Temp 101.6 तापाची गोळी घेण्यापूर्वी
२) Temp 99.2 तापाची गोळी घेतल्यानंतर
३) ऑक्सिजन लेव्हल 93 प्राणायामापूर्वी
४) ऑक्सिजन लेव्हल 95 प्राणायामानंतर
५) आज 55 ते 60 सेकंद श्वास रोखून धरता आला.
----///-----
दिनांक : 24 एप्रिल 2021 : सकाळी 9.00
1) कोरोना संक्रमण होऊ न देणे, इतकी काळजी घेता आली तर तो मनुष्य सावध समजावा.
2) कोरोना संक्रमित झालेला पण त्याला कसलीही कोरोना लक्षणे नसलेली माणसे आता मोठ्या प्रमाणावर "कोरोना करिअर" म्हणून फिरत असेल तर काळजी घेणेही अवघड जाणार आहे.
3) आज 55 ते 65 सेकंद श्वास रोखून धरता आला.
======
दिनांक : 25 एप्रिल 2021 : रात्री - 10.00
1) Temp 98.6 रात्री तापाची गोळी घेण्यापूर्वी
2) ऑक्सिजन लेव्हल 95
3) आज 70 सेकंद श्वास रोखून धरता आला.
----///-----
दिनांक : 25 एप्रिल 2021 : सकाळी 8.00
मी स्वतःच स्वतःची तपासणी केली. +ve रिपोर्ट आल्यावर स्वतःच होम क्वारंटाईन होऊन उपचार सुरु केले. सरकारी आरोग्य खात्याने अजून नोंदही घेतली नाही.
दिनांक : 25 एप्रिल 2021 : सकाळी 10.00
1) Temp 98.5 सकाळी तापाची गोळी घेण्यापूर्वी
2) ऑक्सिजन लेव्हल 95
3) आज 70 सेकंद श्वास रोखून धरता आला.
----///-----
दिनांक : 26 एप्रिल 2021 : दुपार - 03.00
आजचा चौथा दिवस. 36 तासापासून ताप नाही अर्थात दोन वेळेस तापाची गोळी सुरू असताना. आता आजपासून तापाची गोळी आणि सर्व अँटिबायोटिक बंद करून बघायचे ठरले. सबब आजपासून औषधी गोळ्या बंद. बघुयात. बारकाईने स्वतःवर लक्ष ठेऊन आहेच.
विषाणूशी लढणे हे माझे काम नाही. ते काम माझ्या शरीराचे आहे. 3 दिवस मी माझ्या शरीराला विषाणूंशी लढण्यास मदत केली व त्याला रसद पुरवली. आता शरीर स्वतःच्या ताकदीने किती लढते ते बघायचे आहे. शरीराची काय तयारी आणि ताकद आहे ते जोखणेही गरजेचे आहे पण उगीच शरीराला अनावश्यक व सक्तीने मदत करून आपणच आपल्या शरीरावर औषधांचा मारा करणे, संयुक्तिक वाटत नाही. गरज भासल्याबरोबर पुन्हा कुमक पाठवता येईल.
सध्या तरी शरीराला त्याचे काम त्याच्या मर्जीने करू द्यायचे ठरवल्यामुळे आज सकाळ पासून तापाची गोळी व सर्व अँटिबायोटिक वगैरे थांबवले आहे.
1) Temp 98.00
2) ऑक्सिजन लेव्हल 96
3) आज 70 सेकंद श्वास रोखून धरता आला.
----///-----
दिनांक : 28 एप्रिल 2021 : ६ वा दिवस : सकाळी - 10.00
1) Temp नॉर्मल
2) ऑक्सिजन लेव्हल 96 ते 98
3) आज 60 सेकंद श्वास रोखून धरता आला.
4) खोकला नगण्य
5) सर्दी पडसा कायम
6) चव व वास कायम आहे.
7) अशक्तपणा वाढला.
प्राणायाम सुरुवातीचे 10 मिनिट किंचित अवघड, नंतर ठीकठाक पण नेहमीसारखी गती, वेग नाही. प्राणायाम करण्याची नेहमीची शक्ती कायम नाही. थोडी धाप जाणवते.
9) 3 बोटांचे अग्रभागावर सुजन येऊन थोडा टणकपणा. थोडी खाज व दाब दिल्यास वेदना.
10) उजव्या हातावर एक चट्टा दिसतोय. त्रास नाही.
----///-----
- गंगाधर मुटे आर्वीकर
(क्रमशः)
=============
==============