नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कमाल आहे कमाल आहे
वर्षानुवर्षे बा च्या गळ्यात
जुनाच फाटका रुमालआहेे
पाऊस ऊघडल्यावर जमीन रडू लागली
वावरातली पिक पिक पिवळी पडू लागली
आभाळ फाटल पण बा च काळीज नाही फाटल
कारण बा च काळीज बेमिसाल आहे
कमाल आहे....................
जमीन ऊलावी तशी बा ची टाच ऊलली
पण कोनाच्या काळजात नाही सलली
तरीपन बा च्या पायाखाली काटे वाकतात
कारण बा च्या पायाला चिकन मातीची ढाल आहे
कमाल आहे ....................,.
बाच्या घामाचे दिवे प्रत्येक घरात
पण बा चेच घर भयान अंधारात
तरीपण बा अंधारात चाचपडत नाही बसत
कारण बा च्या नजरत माझ्या मायचा आशावादी खयाल आहे
कमाल आहे ...........,........
शेत बाचच खत बी बीयान बाचच असत
रातनदियाच्या कष्टाच पोत्यात ऊत्पन्न असत
तरीपण बा स्वत:च्या मालाचा भाव नाही ठरवत
कारण बाच्या प्रत्येक व्यवहारात दलाल आहे
कमाल आहे ........................
आडत्याच्या दुकाना पर्यंत बाच्याच पाठीवर पोत
तिथे फक्त ओझ उतरावयाला त्याच मानूस उभ होत
तरीपण बा च्याच पट्टीतुन हमाली कपात आहे
कारण बा च्याच पैशात आडत्याच्या हाताखाली बेजार हमाल आहे
कमाल आहे ...........................
बा ला म्हटल कुठवर खितपत राहतो
कुठवर दुसऱ्याच्या ओंजळीन गढूळ पाणी पित बसतो
हकालून दे या दलालांना अन व्यावसायीक शेती कर
कारण व्यवसायातच नफ्याची धमाल आहे
कमाल आहे ............
बा च्या गळ्यात...........
प्रतिक्रिया
अत्यंत सुंदर!
हलकी फुलकी तरीही काळजाला टोचणारी.
हेमंत साळुंके