नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, शेतकर्यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांच्या प्रश्नांचा साकल्याने विचार साहित्य प्रस्तृत करून समाजमनात शेतकरी बांधवाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण महिलांही संघटित होऊन कार्यरत व्हाव्यात अशा बीजस्वरुपी समाजकार्याचा विचार या निवडीमागे असल्याचे समितीने म्हटले आहे.
डॉ. अरुण टीकेकर अध्यक्षतेखालील डॉ. द.ना.धनागरे, डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुधीर जोगळेकर आणि सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर या मंडळींनी यंदाच्या २१ व्या जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीचे कामकाज पाहिले.
मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये असे पुरकार स्वरूप असलेला हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२), डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५), श्रीमान पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९) आणि श्रीमान नानाजी देशमुख (२००३) आणि सौ. साधनाताई आमटे (२००७) या मान्यवरांना देण्यात आला आहे.
हा पुरस्कार स्वीकारण्यास श्री. शरद जोशी यांनीही सानंद संमती दिली असून डिसेंबर २०११ मध्ये मुंबईत होणार्या चतुरंग रंगसंमेलनात श्री. शरद जोशी यांना तो प्रदान करण्यात येईल.
प्रतिक्रिया
श्री. शरद जोशी साहेबांवर
श्री. शरद जोशी साहेबांवर निस्सिम प्रेम करणार्या पाईकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
शेतकरी तितुका एक एक!
पाने