नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कौतूक तू सांगू नको खोट्या विकासाचे
उघडून डोळे हाल बघ घायाळ देशाचे
पडताच मजला स्वप्न काशी चारधामाचे
सर्वात आधी पाय धरतो मायबापाचे
शेअर्सचे हमखास दर भिडतात गगनाला
का भाव कोसळतात कायम शेतमालाचे?
कृत्ये तुझी आहेत सगळी रावणावाणी
दुनियेपुढे घेतोस केवळ नाव रामाचे
बांधावरी ज्या घेतला गळफास बापाने
नाही रुजत कुठल्याच तेथे बीज झाडाचे
पारख करायाला गुणांची वेळ कोणाला
पडले जगाला फक्त माझ्या जात धर्माचे
त्याच्याचपासुन जन्मले आहे तरी सुद्धा
अस्तित्वही नाही दिसत शहरात गावाचे
घरदार ना शेजार ना सरकार कोणीही
आहेस तू केवळ तुझ्या कारण विनाशाचे
दिसण्यावरी गंधावरी होते फिदा दुनिया
नाही दिसत कोणासही काटे गुलाबाचे
मातीमधे अवघ्या कमाईला उधळल्यावर
समजेल जगणे काय असते कास्तकाराचे
विसरायचो नाही कधीही मोल घामाचे
आयुष्य जगतो आजही मी स्वाभिमानाचे
--- चंद्रकांत देवराव कदम (सन्मित्र)
नांदेड (मो.9921788961)
प्रतिक्रिया
सुंदर आणि वास्तव कथन
सुंदर आणि वास्तव कथन
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.
या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.
आज 30 सप्टेंबर रोजी तशी सुधारणा झाली नाही तर सदर प्रवेशिका डिलीट करण्यात येईल, कृपया नोंद घ्यावी.
शेतकरी तितुका एक एक!
पाने