नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भक्त श्री विष्णूचा l होता शक्तिमान l
कर्तुत्ववान बळी l राजा रयतेचा ll
दक्षिण भारतात होते l राज्य तयाचे मोठे l.
रोगराई तेथे l दिसत नव्हती ll
पीक पाणी भरपूर l नसे धान्याची नुपर l
तेथे जातीभेद नसे l सुख शांती वसे l
राज्यात बळीच्या ll
यज्ञादी कर्म lपर्यावरण शुद्धीचे वर्म l
जाणिले होते बळीने l राज्यात आपल्या. ll
अबला सुरक्षित l होत्या आनंदात l
मुलेही रोगमुक्त l असे बळीच्या राज्यात ll
बहुछंदी राजा होता l खेळत होता गंजी पत्ता l
वेश्या गमनही कधी कधी l करीत असे बळीराजा ll
एकदा मोती हिरे जिंकले l ते शिवास वाहिले l.
राज्य ही इंद्राचे भोगले l काही काळ बळीराजाने ll
हतबल झाला इंद्र l विष्णूशी विनवी वारंवार l
करावे तुम्ही ठार l बळीराजाला ll
अति तेथे माती l होई निश्चिती l
याची प्रचिती l आली बळीराजाला ll
बळीराजा दानशूर अति l होती त्याची ही ख्याती l
वामनाने मागितले दान l तीन पावले जमीन ll
दान देण्यास तत्पर l करावी जमीन स्वीकार l
विष्णूचा अवतार होता वामन l कराया बळीराजा पावन l
ठेवीला एक पाय धरतीवर l दुसरा तो स्वर्गावर l
तिसरा पाय डोक्यावर l बळीराजाच्या ll
होता स्पर्श पावलाचा l बळी जाय पाताळी साचा l
राज्य दिले विष्णूने l पाताळी तयासी l
विष्णू झाले द्वारपाल l पाताळी काही काळ l
परी होती आस राजाला l रयतेला त्याच्या भेटण्याची ll
बळीराजा येई धरतीवर l बलिप्रतिपदेला सत्वर l
त्याचा करावा आदर l अन् उत्सव दीपावलीचा ll
रचना
विनायक अंगाईतकर
मोबाईल नंबर 9021627407