पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
चंद्रवदना ...
मृदगंध पसरला, घुमली शीळ लाघवी ती पळते खिदळत सर की, चंद्रवदना नवी ती?
रुतले सदैव काटे, गजर्यास गुंफताना ती कमनशीब पुष्पे, वेणीस लाजवीती
कित्येकदा झर्यांना, लाटा गिळून घेती घेणार जन्म तेथे, कल्लोळ,यादवी ती
बोलायचे तुला जे, ते बोल निश्चयाने शंका कदाचित तुझी, असणार वाजवी ती
छाया नरोत्तमाची, अभयास उब देते त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती
गंगाधर मुटे ........................................................ (वृत्त - आनंदकंद ) ..................................................................
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.