![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
धरेचे लेकरू आपण
उचल समशेर क्रांतीची लढा देऊ मरू आपण
अमर त्यागी युगात्म्याचे खरे वारस ठरू आपण
जरी भडीमार लाटांचा विचारांची कडी जोडू
धरू या एकमेकांना पुरामध्ये तरू आपण
फुकट नाही मिळत काही करू मजबूत संघटना
बळावर एकतेच्या चल बळीला सावरू आपण
जमाना फास घेण्याचा जुना झाला बळीराजा
नव्या तंत्रात विश्वाच्या भुकेला चेंगरू आपण
जरी गगनी भरारी घेतली आहेस यशवंता
तरीही भान राहूदे धरेचे लेकरू आपण
- यशवंत,गंगाखेड
प्रतिक्रिया
साहित्य संम्मेलन
स्तुत्य व सुंदर उपक्रम घेत आहात सरजी
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
शिर्षक बदला
शिर्षक धरेचे लेकरू ठरू आपण हे आहे.परंतू आमच्या तांत्रीक अज्ञानामुळे ते दिसत नसावे.. क्षमा असावी
ओके. शीर्षकात बदल करून
ओके. शीर्षकात बदल करून देण्यात येत आहे.
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
जमाना फास घेण्याचा...
लेकरू आपणं...
उत्तम
सुनिल बावणे
पाने