नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

दानशूर बळीराजा

surekha's picture
लेखनविभाग: 
छंदोबद्ध कविता
लेखनाचा विषय: 
शेतकऱ्याचा राजा बळीराजा
अष्टाक्षरी
दानशूर बळीराजा
 
प्रल्हादाचा नातू बळी
प्रजाहितदक्ष राजा,
सप्तचिरंजीवांपैकी
पुराणात बळीराजा.
 
एक महान सम्राट
बहुजन समाजाचा,
दानशूर बळीराजा
वाली तो शेतकऱ्यांचा.
 
 
राजा हा सामर्थ्यशाली
पराक्रमी बलवान,
राज्य चालवी न्यायाने
सद्गुणी बुद्धिमान.
 
सुखी, समाधानी प्रजा
नांदे बळीच्या राज्यात,
शेतकरी हे संपन्न
बळी राजाच्या काळात.
 
कौशल्याने शेतकरी
भरे धान्याची कोठारे,
वाढे वैभव राज्याचे
होती समृद्ध नगरे.
 
सौ सुरेखा बोरकर
नागपूर
Share
Layout Settings