पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
हे खेळ संचिताचे .....!
काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला
सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू" हस्त माझा रेखतांना का असा भांबावला
हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मुक्त पान्हा चोरला
तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला?
पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती झुंजताना एकला मी, श्वासही सुस्तावला
साठले कंठात होते, सप्तकाचे सूर मी साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला
संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी ’अभय’ रस्ता, काळही भारावला
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.