Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

कोरोना काळ आणि भाजीपाला पिकाला मीळालेला भाव

Main page content

By निलेश देवकर | 9:49 PM IST, Tue September 24, 2024
शेतकरी जीवनातील सुखद अनुभव

कोरोना काळ आणि भाजीपाला पिकाला मीळालेला भाव

कोवीड १९ मूळे संपूर्ण जगात धास्ती आणि भितीचे वातावरण पसरले होते . भारत सरकारने मार्च २०२० ला संपूर्ण लाॅकडाऊन चा आदेश काढला.त्यानंतर हळूहळू लाॅकडाऊन वाढतच गेले. आमच्या कडे थोडीशी बागायती शेती असून आमच्या परीसरातील अनेक शेतकरी हे साधारणतः इतर पीकांबरोबर भाजीपाला पीकाचे उत्पादन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गाव अकोला शहरापासून साधारणतः १२ कि. मी. अंतरावर असल्याने पूर्वी बैलगाडीने आणि आजच्या काळात भाड्याच्या वाहनानी शेतकरी आपला शेतमाल, भाजीपाला मंडईत आणि बाजार समितीत पोहोचवतात.
आमच्या वडीलांनी कोवीड परीस्थीतीत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भाजीपाला वर्गीय पालकाचे पीक घेण्याचे ठरविले. उपलब्ध पाणी स्रोताचा विचार करून त्यासाठी पाऊन एकर जागेवर नियोजन केले, शेत तयार झाले, वाफे वगैरे तयार करून पालकाचे बी शेतात टाकले. संपूर्ण लॉकडाऊन असल्यावरही शेतीकामास मुभा होती,हे बरेच होते. संपूर्ण मशागती नंतर पालक पीक एक महिन्यात तयार झाले. पालक काढणीस आला त्याची काढणी सुरू केली. गाडीवान आणि भाजी बाजारातील कमीशन एजंट दोघेही अतिशय प्रामाणिक आणि ईमानदार व्यक्ती. तसा त्यांच्याशी असलेल्या अनेक वर्षे संबधातून ही खात्री निर्माण झालेली.दुपारी चार नंतर पालकाची काढणी करायची ,पालक शेतात धुऊन बैलगाडीने घरी न्यायचे,रात्री पालकाच्या जुळ्या उभ्या करायच्या . कारण त्याचे पॅकींग संध्याकाळीच केले तर तो खराब व्हायची शक्यता अधिक .रात्री दोन वाजता उठायचे, पालक फारी मध्ये रचून बांधायचा सकाळी ४.०० ला गाडीवान गाडीत गावातील आमच्या मालासह इतरांचा माल घेऊन जायचा.मालाचा तुडवडा असल्याने भाजीपाला मंडईत दिवस उजाडण्या पूर्वी माल विकला जायचा. तो ही इतर वेळच्या भावापेक्षा तिप्पट तर कधी चौपट भावात.शहरातीलच नव्हे तर बाहेरगावाहून आलेलेही विक्रेते बाजारात यायचे, उशीरा आलेल्यांना रिकामा हाताने परत जावे लागत असे.तुडवड्यामुळे भाजीपाला विक्रेते चढ्या भावाने माल खरेदी करत असत.भाजीपाला विक्रेत्यांना तो माल प्रशासनाने सुट दिलेल्या सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेतच विकावा लागायचा. त्यामूळे त्यांच्याकडचाही माल तीन तासात संपून जायचा.कमीशन एजंट विकलेल्या मालाची पट्टी पैशांसह गाडीवाल्याकडे पाठवून द्यायचा.सकाळी ८.०० पर्यंत विकलेल्या मालाचे पैसे हातात पडायचे.
पुढील काही दिवस शेतातील पालकाचे पिक संपेपर्यंत हे चालले.त्या भितीदायक आणि नकारात्मक काळात या पिकाने पावसाळ्याच्या सुरूवातीलाच समाधानकारक आर्थिक लाभ दिला. नेहमी शेतमालाच्या भावाची चिंता सतावत असते . पण हा काळ भाजीपाला पिकाच्या बाबतीत सुखावह ठरला असेच म्हणावे लागेल .

-निलेश जगदेवराव देवकर .
मु.पो.डोंगरगाव ता.जि.अकोला.444104
मो.क्र.9604919343.
e mail- nileshdeokar35@gmail.com

  • Log in or register to post comments
  • Like
  • 53 views

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 11 *
Who's new नवीन सदस्य
  • RATNESH CHAUDHARI
  • spatil
  • BHAUPATIL Gadakh
  • sandip-7829
  • laxman18

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अत्यंत अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि तितकाच संवेदनशील
    10 hours 16 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला थेट भिडणारी रचना!
    10 hours 21 minutes ago
  • दळवी सरांची दिवाबत्ती सुंदर…
    10 hours 43 minutes ago
  • लोकांना काय सांगू?
    13 hours ago
  • मातीच्या कुशीत रुजलेले स्वप्न
    13 hours 51 minutes ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Adsense

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ