Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




साहेबराव करपे व त्यांच्या परिवाराच्या पार्थिवा बरोबर माझा प्रवास

*साहेबराव करपे व त्यांच्या परिवाराच्या पार्थिवा बरोबर माझा प्रवास.*
- विनोद दुबे

20 मार्च 1986, वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी संघटनेचे प्रणेते, शेतकर्यांचे पंचप्राण शरद जोशी साहेब उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजीत केला गेला होता. त्याच्या पुर्व तयारीसाठी, 19 मार्च ला शेतकरी कृषीभवन बजाज चौक येथे आम्ही वर्धा जिल्हातील नेते-कार्यकर्ते जमलो होतो .दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान दत्तपूर येथे शेतकरी परिवाराची सामुहीक आत्महत्येची बातमी कळली व आम्ही सगळ्यांनी दत्तपूर कडे धाव घेतली . कुष्टधाम दत्तपूर यांच्या शेतातील एका गोडाऊन समोर दोन पोलीस आठ-दहा बघे होते . आम्ही जेव्हा गेलो तर शव कुजायला लागले होते , दुर्गंधीनेच या आत्महत्येची माहीती कूष्ठधामच्या लोकांना कळली होती. कूष्ठधामच्या लोकांशी संवाद साधल्या नंतर त्यांनी जि माहीती दिली त्यावरून हा परिवार यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावचा. 1986 च्या मार्च महीन्यात वर्धा येथे आला होता. सेवाग्राम येथील गांधी आश्रम ,पडनार येथील विनोबा आश्रम ला भेट दीली व दत्तपूर येथे कुष्टधाम येथे मुक्कामी थांबले. कोणालाच त्यांच्या मनात काय चालले आहे याचा थांग पत्ता नव्हता . परिवार तिन -चार दिवसा आधी येथे आला व आम्ही फिरायला आलो आहो ,गांधी विनोबा बद्दल आदर असून त्याच्या कार्याबद्दल अधीक जावून घ्यायचे असल्याने आम्हाला दोन दिवस येथे थांबायला परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. त्यांच्या विनंती वरून त्यांना तेथील गोडाऊन मध्ये थांबण्याची व्यवस्था करून दिली गेली .
गोडाऊन मधून दुर्गंधी यायला लागल्यावर पोलिसात खबर देण्यात आली व शेतकरी परिवाराची सामुहीक पहीली आत्महत्या उघडकीस आली .
शव तातडीने पोष्टमार्टम करिता वर्धा सरकारी दवाखान्यात आणायचे होते. संघटनेचे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सगळे सोपस्कार पार पाडत होते ,आपलाच परिवार आपल्या पासून हिरावला आहे ही भावना सगळ्या संघटना कार्यकर्त्यांची होती ज्याला ज्या पद्धतीने जमेल तशी मदत करत होता .
अंदाजे चार वाजता दरम्यान पोष्टमार्टम होऊन शव आम्हाला सोपवण्यात आले .चिलगव्हान या गावातून तिन -चार लोक आले होते .मॅटोडोर भाड्याने घेऊन त्यात शव ठेवण्यात आले. सगळे शव प्लास्टक कागदात गुंडाळून पांढ-या कापडांने व्यवस्थीत बांधण्यात आले होते .तरी त्यातून पाणी व दुर्गंधी झिरपत होती .शवा सोबत चिलगव्हानला घेऊन जाण्या करिता शेतकरी संघटनेच्या नेत्या सुमन ताई अग्रवाल व मला जाण्यास सांगण्यात आले .
सुगंधी अगरबत्ती, इत्र ,निलगीरी तेल आदी घेऊन आम्ही शवा सोबत प्रवासाला सुरवात केली सुमनताईना समोर क्याबीन मध्ये बसवून मि व चिलगव्हान वरून आलेले दोघे मागे डाल्यात प्रवास सुरू झाला दोन - अडीच शे किलोमीटरचा हा प्रवास मागे उभा राहूनच करावा लागला दुर्गंधीने डोक सुन्न झाल होते. पायातही खुप त्रास होत होता पण पर्याय काय ?
रात्री अकरा वाजता च्या दरम्यान चिलगव्हान येथे पोहोचलो. निरोप आधीच पोहचल्याने सरण आधीच रचून ठेवलेले होते. सरळ मेट्याडोर सरणा जवळच लावण्यात आला. सहा पराभुत शेतकर्यांचे गतप्राण शरीर चितेवर ठेवण्यात आली. या दुर्दैवी परिवाराला घरी न नेताच अग्नीच्या स्वाधीन केल्या गेले .
त्या नंतर त्यांच्या घरी थोडा वेळ थांबुन परतीच्या प्रवासाला लागलो रात्री एका पाहुण्याच्या कमांडर जीप ने पुसद बस स्टॅंड गाठला. रात्री कोणतीच बस वर्धा करिता नव्हती पहाटे पाच ला बस लागेल ही माहीती मिळाली. मी व सुमनताईंना रात्र बसस्टांड च्या बाकावरच काढावी लागली. पहाटे बस धरून अकरा वाजता वर्धाला पोहोचलो. सुमनताई ना घरी सोडून घरी आलो आंघोळ करून पुन्हा मेळाव्यात मि व सुमनताई हजर होतो .
२० मार्च १९८६ च्या याच मेळ्यात शरद जोशींनी या परिवाराला श्रद्धाजंली वाहून या देशात शेतकरी आत्महत्येचे मोठे सत्र सुरू होईल हे भाकित केले होते . त्या नंतर साहेबांनी शेतकरी विरोधी व्यवस्थेने शेतक-याना आत्महत्येच्या खाईत ढकलले आहे , शेतकरी विरोधी कायदा किती घातक आहे हे अनेक सभां मध्ये सांगीतले .औरंगाबाद कोर्टातील हजारो वकिलांसमोर शरद जोशींनी शेतकरी विरोधी कायद्यां बद्दल मांडणी केली होती.
गेली चार वर्ष १९ मार्चला साहेबराव करपे यांच्या आत्महत्ये बद्दल सहवेदना व्यक्त करण्यासाठी उपोषणाचे आवाहन केले जाते. त्याला किती प्रतिसाद मिळतो हा भाग गौन आहे पण शेतकर्याच्या आत्महत्या रोकण्यासाठी याचा काही उपयोग होताना दिसत नाही.
किसानपुत्र आंदोलनाचे जनक एके काळी शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते होते, विचारवंतां मध्ये त्यांची गनना होती, शरद जोशींचे निकटवर्तीय मानले जायचे. त्य‍ंना सवतासुबा उभा करण्याचे काय कारण पडले असावे हे समजण्या पलीकडचे आहे, ते ही शरद जोशी हयात असत‍ना!!
किसान पुत्र आंदोलनाने सर्वोच्च न्यायालयात शेतकरी विरोधी कायद्याचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. कायदे करणे बदलणे हा विषय लोकसभेचा, राज्यसभेचा, राष्ट्रपतींचा आहे म्हणुन शासनावर दबाव निर्म‍ण करा असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे किसानपुत्रला याचिका मागे घ्यावी लागली आहे.
शरद जोशींना न्यायालयाचा मार्ग माहीत नव्हता का? माहीत होता पण हे ही माहीत होते की सरकारचे धोरण (मानसिकता) बदलल्या शिवाय कायदे बदलणार नाहीत. म्हणुन त्यांनी शेवटच्या श्वासा पर्यंत शासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वेगळे आंदोलन उभे करण्या पेक्षा शरद जोशीं बरोबरच राहुन जर काम केले असते तर सराकरचे धोरण लवकर बदलण्यास मदत झाली असती. आम्ही शरद जोशींचे कार्यकर्ते त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहोत. एक दिवस आपल्या डोळ्या देखत सरकारचे शेतकरी विरोधी धोरण व शेतकरी विरोधी कायदे बदललेले पहायला मिळतील या अपेक्षेने काम सुरु आहे.
साहेबराव करपेंच्या आत्महत्ये नंतर देशात आत्महत्या सुरुच आहेत. एक अर्धा दिवस उपोषण करुन प्रसिद्धी मिळेल पण शेतकर्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. साहेबराव करपे, त्याचे कुटुंबीय व त्यानंतर मृत्यूस कवटाळणार्या लाखो शेतकर्याच्या आत्म्यांना शांती मिळवी असे वाटत असेल तर पुन्हा शरद जोशींच्या विचारात एकत्र या. सरकारवर दबाव निर्माण करुन गुढगे टेकायला लावू या. हिच खरी साहेबराव करपेंना श्रद्धांजली व अन्नदात्या विषयी सहवेदना.

- विनोद दुबे, नागपुर.

Share