नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
खाल्ल्या अन्नाला जागा
शेतकऱ्याचे कैवारी म्हणून आणू नका आव
भीक नको आम्हाला हवा शेतमालाला भाव
पिढ्यान पिढ्या शेती मध्ये राबत आलो आम्ही
पिकवतो आम्ही आणि भाव ठरवता तुम्ही
भाव वधारले की मारता आयातीचा घाव
नको लाडका भाउ, लाडकी बहिण, लाडका शेतकरी
आमच्या मनगटात ताकद आम्ही पिकवतो कितीतरी
हवा आम्हाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव
कमळाने लुटले, पंजाने लुटले. लुटून गेली तुतारी
कृषीप्रधान देशातला शेतकरी बनला भिकारी
आता शरद जोशीने पुन्हा एकदा नव्याने जन्म घ्यावं
समजु नका आम्हाला की आमच्यात दम नाही
देशाचे पोषण करतो आम्ही मुळीच कमजोर नाही
सळो की पळो करून सोडू असा करू उठाव
तुमच्या ताटातले अन्न आमचेच असते की राव
मग भाजी भाकरी असो की असो वडापाव
खाल्ल्या अन्नाला जागा नेत्यांनो मिळुद्या की भाव
भीक नको आम्हाला हवा शेतमालाला भाव
- राजेश अंगाईतकर
पत्ता: धनश्री नगर, पिंपळगाव बायपास, यवतमाळ
फो. नं. : ७०२०७६३९५५
प्रतिक्रिया
खूप छान!
खूप छान काव्यलेखन केले आहे.
मुक्तविहारी
पाने