नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ATM समोरील भिकारी
खूप दिवसांनी ATM मधून पैसे काढायला गेलो, आणि आश्चर्य म्हणजे cash होती. बरं गर्दी म्हणावी तर माझ्या पुढे फक्त दोन जण त्यातूनही एक पैसे काढणारा आणि दुसरा फक्त सोबत निव्वळ सोबतच.... तसं आपल्या देशात तुंबलेले गटार जर JCB सारखी यंत्र वापरून काढत असले तर ते पाहण्या साठी पन्नास जण उभे असतात.. "कामच काय आहेत दुसरी?" मग ATM मधून दिवसाला फक्त 40 हजार निघतात हे किती चुकीचे आहे ह्यावर माझ्या पुढचे दोघे माझ्या मागचे दोघे असे वेगवेगळ्या चर्चा करत होते. मग मी मागच्याला बोललो," cash किती आहे काय माहीत राव ATM मध्ये ? नाहीतर आपला नंबर येईल, अन cash जाईल संपून' त्यावर मागचा बोलला मला चारच हजार काढायचेत कॉन्व्हेंट मध्ये काम करताना बारा तास घासून घेतात पण पगार काय तर दहा हजार.. आहेत कुणाच्या खात्यात जास्त पैसे?" मग मी प्रश्नार्थक नजर त्याच्या मागच्या कडे फिरवली तो खांदे उडवत बोलला ,"बॅलन्स पाहायचं फक्त" तेवढ्यात माझ्या पुढला दोन हजार च्या तीन नोटा तीन वेळ मोजत खिशात ठेऊन हसत बाहेर आला एकंदर त्या चार पाच जणांपैकी कुणीही 40 हजार च्या मर्यादेमुळे अडचणीत येणार नव्हता हे स्पष्ट झाले होते मग आम्ही त्या मुद्द्यावर चर्चा का करत होतो? तेही सर्वजण एकमेकांना ओळखत नसताना? असे प्रश्न मनात घेऊन मी ATM च्या कक्षात प्रवेश केला. आतील Ac बंद होता लगेच घामाच्या धारा वाहू लागल्या घाम पुसत कार्ड swaip केले, मग दहा हजार काढले त्या दोन हजार च्या नोटा होत्या. बाहेर आलो घाम पुसत पायऱ्या उतरल्या एक लढाई जिंकून आल्याप्रमाणे लाईन मध्ये उभ्या इतर लोकांवर तुच्छ नजर फिरवली तुच्छ ह्यासाठी की आपण आपले काम झाले की सर्व जण असेच वागतात नाही का? मग गाडीपाशी आलो गाडी स्टार्ट केली गियर टाकला आणि मी तेथून निघणार तोच.... तोच एक सतरा अठरा वर्षाचा पोरगा भीक मागत आला , त्याने त्याच्या देवाचा नामोद्धार करत भीक मागितली, मी खिशात चाचपडून पाहिले खरच 2 हजार च्या नोटा शिवाय काही नव्हते मग त्याला बोललो "छुट्टा नही है" (हे आपलं वैशिष्टच भिकारी कोणत्याही देवाला घेऊन मिरवत असला तरी आपण हिंदीतच बोलायचं) त्यावर तो बोलला "ATM मे से निकले ना तुम्म"... हा तुम्म मला खटकला, कारण त्यात एक प्रकारची हेटाळणी होती, माझ्या देण्याच्या वृत्तीवर अप्रत्यक्ष शंका घेतली जात होती. (म्हणजे मी किरण नाव असल्यामुळे स्वतः ला कर्णाच्या राशीचा समजतो अस काहीसं) मग काय माझी सटकली आणि मी लगेच खिशात कोंबलेले पैसे काढले त्यातून दोन हजार ची नोट त्याच्या समोर धरली आणि बोललो "लेता क्या बोल?" आता तो शहारला, मानेनेच नकार देत बोलला, "नही साब इत्ते नही..." मग मी त्याच्याकडे पाहिले आणि बोललो फिर मैने बोला था न तेरेकू?, अब जा और देश का प्रधान मंत्री नरेंद्र मोदी है ये ध्यान मे रख!" यावर तो मनमोकळा हसला आणि निघून गेला. मी त्याच्या कडे पाहत राहिलो आणि सहज शंका आली मी त्याच्या पुढे धरलेली नोट त्यांनी हात पुढे करून घेतली असती तर ..... आणि लगेच उत्तर मिळाले की त्याने दोन हजारची नोट घेतली असती तर माझा व्यवहारी मेंदू बोलला असता "अरे एक हजार नऊ सौ नव्वद रुपये वापस तो दे बे, दहा रुपये ठेऊन घे त्यातले..."
*किरण शिवहर डोंगरदिवे* समता नगर मेहकर , ता मेेेहकर जिल्हा बुुलडाणा पिन 443301, मोबा 7588565576
प्रतिक्रिया
छान अनुभव
ए.टी.एम. मधून पैसे काढताना आलेला अनुभव छान रंगवून मांडला सर लेखनातून !
मुक्तविहारी
पाने