Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ : प्रारंभिक चर्चा

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

           मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी जागतिक मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मी माझ्यापरीने काहीतरी करावे म्हणून शेतकरी साहित्य चळवळ स्थापन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता.

           गेली ७ महिने मी अनेक मित्रांशी, साहित्य क्षेत्रातील जाणकारांशी, व्यवस्थापकीय तज्ज्ञांशी या विषयावर सल्लामसलत करत आलो आहे. प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याने पहिला टप्पा यशस्वी झाला असे म्हणता येईल. आता दुसर्‍या टप्प्यात आंतरजालावरील कवींशी, लेखकांशी, मित्रांशी, जाणकारांशी व तज्ज्ञांशी चर्चा करायची आहे. आपले सहकार्य अपेक्षित आहे. या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी कृपया abmssc@shetkari.in या मेलवर एक मेल करावी जेणेकरून त्यांच्यांशी संपर्क साधणे आणि सहकारी मंडळाच्या यादीत त्यांचा समावेश करणे शक्य होईल.

           आजवर मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलने झालीत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. या दिशेने गतकाळात कुणी प्रयत्न केल्याचे निदान मला तरी ज्ञात नाही म्हणूनच या दिशेने पाऊल टाकण्याचा मानस आहे. हे कार्य किती कठीण आहे याची जाणीव असली तरी हे कार्य अशक्यप्राय नाही याचीही खात्री आहे. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची पायाभरणी करून पुढील चार महिन्याच्या आत अ.भा. स्तरावर मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करायचे ठरवले आहे आणि त्यानंतर दरवर्षी मराठी शेतकरी साहित्य संमेलन भरवणे शक्य व्हावे म्हणून संघटनात्मक बांधणी करायचे सुद्धा ठरवले आहे. हे कार्य जोखिमेचे असले तरी ऐतिहासिक आहे. एकूणच शेतीविषयाला व साहित्यक्षेत्राला कलाटणी देण्याची ऐपत बाळगणारे आहे. मात्र प्रयोग नवा असल्याने अत्यंत विचारपूर्वक पावले टाकावी लागतील कारण या निमित्ताने शेतीसाहित्य चळवळीचा पाया रचला जाणार आहे. 

यासंदर्भात खालील विषयावर विचारमंथन अपेक्षित आहे.

१) संघटनात्मक बांधणीचे स्वरूप
२) कार्यक्षेत्राची भौगोलिक व्यापकता
३) वर्षभर राबवायच्या कार्यक्रमांचे/उपक्रमांचे स्वरूप
४) स्वतंत्र संकेतस्थळ (http://www.shetkari.in/ निर्माण केले आहे.)
५) पहिले संमेलन (केव्हा व कुठे)
६) संमेलनाचे प्रारूप/आराखडा
७) मासिक/त्रैमासिक/विशेषांक काढणे
८) लोगो/Logo
९) याखेरीज आणखी संबंधित विषय

           या कामात मला मार्गदर्शक आणि सहकार्‍यांची प्रचंड आवश्यकता आहे. या निमित्ताने मी आपल्यासमोर मार्गदर्शन आणि सहकाराची अपेक्षा करतो आहे. जाणकारांनी आणि स्वेच्छूक मंडळींनी स्वतःहून समोर यावे. ही विनंती.

सहकार्याच्या अपेक्षेत...!

                                                                                                                  आपला नम्र
                                                                                                                  गंगाधर मुटे

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 18/10/2014 - 16:43. वाजता प्रकाशित केले.
    पहिले शेतकरी साहित्य संमेलन केव्हा आणि कुठे : अभाशेसाच-२


    नमस्कार मित्रांनो,

         अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीसाठी 'आपुलकीचे' श्री अभिजित फाळके यांनी 'लोगो' तयार करून द्यायचे मान्य केले आहे.  Thanks  Abhijeet Arunrao Falke sir!

        कालच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आज आपण शेतकरी साहित्य संमेलन केव्हा आणि कुठे घ्यावे याविषयी चर्चा करुया.

    पहिले शेतकरी साहित्य संमेलन केव्हा :


    - फेब्रुवारीच्या आधीचा काळ हा कडाक्याच्या थंडीचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीच्या हंगामाचा काळ असतो. आणि फेब्रुवारीच्या नंतरचा काळ शालेय परीक्षांचा असतो. त्यामुळे फेब्रुवारी महिना अधिक सोईचा ठरेल, असे मला वाटते.

    पहिले शेतकरी साहित्य संमेलन कुठे घ्यावे :


    - याविषयी मात्र भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. काही पर्याय मी आपल्यासमोर ठेवत आहे. काही पर्याय आपण सुचवावेत.

    a
    १) राज्याची राजकीय राजधानी  अर्थात मुंबई.
    २) विद्येचे माहेरघर अर्थात पुणे.
    ३) ग्रामस्वराज्याच्या आणि सुराज्याच्या संकल्पनेचे आणि म. गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेले सेवाग्राम.
    ४) एखादे मध्यम लोकसंख्येचे खेडेगाव.

     आपल्या सुचना इथेच किंवा abmssc@shetkari.in या  मेलवर आमंत्रित आहेत.

    आपला नम्र
    गंगाधर मुटे
    --------------------------------------------------------------------------------------------------------------

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 19/10/2014 - 03:02. वाजता प्रकाशित केले.

    www.shetkari.in हे संकेतस्थळ का व कशासाठी? : अभामशेसाच - ३

    अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीसाठी www.shetkari.in हे सोशल नेटवर्किंगच्या धर्तीवर स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे. या कामासाठी स्वतंत्र संकेतस्थळ का व कशासाठी? असा अनेकांना प्रश्न पडण्याची शक्यता आहे. कारण सध्या सहजगत्या वापरण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त असे सार्वजनिक संकेतस्थळे मुबलक आणि तेही फुकटात उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत पदरचे काही हजार रुपये खर्च करून स्वत:चे नवीन संकेतस्थळ निर्माण करणे अनेकांना अनावश्यक वाटण्याची शक्यता आहे. पण मुख्यत्वे दस्तावेज सुरक्षेचा विचार करता स्वत:चे संकेतस्थळ असणे अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
    १) आपण कुठल्याही संकेतस्थळावर सदस्यत्व घेतले की आपल्याला तेथे मुक्तसंचार, वाचन आणि लेखनाचे अधिकार मिळून जातात. पण आपण केलेल्या लेखनाचा किंवा त्यावरील प्रतिसादांचा आपल्याला Back Up घेता येत नाही. तांत्रिक बिघाडामुळे किंवा व्हायरसच्या आक्रमणाने किंवा सर्व्हर burst/break झाल्याने जर एखादी साईट कोसळली किंवा डाटाबेस प्रभावित झाला तर आपले आजवरचे सर्व लेखन, त्यावरील प्रतीसादासाहित नष्ट होऊ शकते. ते लेखन पुन्हा प्राप्त करण्याचे अथवा त्यासाठी प्रयत्न करण्याचे आपल्यासमोर कुठलेही पर्याय उपलब्ध असत नाहीत. हे खरे कि, सर्व संकेतस्थळचालक आपापल्या संकेतस्थळांचा नियमित Back Up घेत असतात, पण त्यासाठी ते बांधील नसतात किंवा लेखकांच्या लेखनाच्या जतन-सुरक्षेची हमी कोणत्याही संकेतस्थळाने स्वीकारलेलीही नसतेच. हेही खरे कि, अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता धूसर असते पण; जर उद्भवलीच तर आपली गाथा आपणच इंद्रायणीत बुडवल्यासारखी स्थिती आपल्यावर ओढवू शकते. आणि या आयटी टेक्नोलॉजीरुपी इंद्रायणीत एकदा गाथा डुबली की डूबलीच समजायचे. याउलट आपल्या स्वत:च्या संकेतस्थळावर आपले नियंत्रण असते. हवा तेव्हा Back Up घेता येउन तो अन्यत्र साठवता येतो. त्यामुळे कितीही आकस्मिक तांत्रिक बिघाडाची आपत्कालीन स्थिती उद्भवली तरी फार तर शेवटच्या ४-८ दिवसातील लेखन वगळता अन्य सर्व लेखनसामुग्री आपण रिकव्हर करू शकतो.

    २) अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यशस्वी करण्यात जर आपल्याला यश आले तर ते ऐतिहासिक आणि भविष्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे अगदी प्रारंभापासूनची सर्व लेखनसामग्री जतन करणे, हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे. त्यात कसूर व हयगय होताच कामा नये.

    ३) पायपीट, दळणवळण आणि संचार माध्यमांच्या सहाय्याने आजवर जी कार्ये पार पाडली जायची तीच कार्ये अधिक सक्षमतेने व प्रभावीपणे आता आंतरजालाच्या माध्यमातून घरबसल्या साकार करणे, सहज शक्य होणार आहे. उदा. भेटी-गाठी, संवाद, चर्चा, परिसंवाद, वादविवाद, बैठका, कवीसंमेलन, स्पर्धा वगैरे.

    यानिमित्ताने आय टी तंत्रज्ञानाच्या नव्या युगात आता आपण पुढाकार घेऊन काही रचनात्मक कामासाठी आंतरजालाचा विधायक उपयोग करण्याचे प्रयोग करूयात.

    तर मित्रांनो, व्हा तय्यार!
    घोडा आणि मैदान तुमची प्रतीक्षा करत आहे!!

    शेतकरी तितुका एक एक!