नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
* आणले पाहिजे पुन्हा बळीचे राज*
कोरोनाची करून माती
बापाने केली हिरवी शेती,
काळ्या मातीत पिकविले
हिरे माणिक आणि मोती.
कोरोनाचा तो विषाणू
भिला माझ्या बापाला,
ठेचून काढला रुमण्याने
त्या कोरोनाच्या सापाला.
जग सारे थांबले होते
माझा बाप पळत होता,
घास भरविण्या भूकेल्याला
घाम मातीत गाळत होता.
पोटावरती हात फिरवीत
नेता ए.,सीत लोळत होता,
पाखरांना सावली देत
बाप उन्हात तळत होता.
पैस्यासाठी नव्हता धावत
कर्तव्य आपले बजावीत होता,
देशसेवेच्या कार्यासाठी
देह आगीत झिजवीत होता.
देव ही भिवुन कोरोनाला
दार लावुन बसला होता,
शेतकऱ्यांच्या रुपात देव
माणसांना दिसला होता.
नेत्यावानी बापाला
नाही धनाची बिलकुल हाव,
भाळावरच्या घामाला
हावा त्याला सोन्याचा भाव.
बळीविरोधी सरकारचा
उतरविला पाहिजे माज,
कोरोनासकट मातीत गाडून
आणले पाहिजे पुन्हा बळीचे राज.
कवी
बा.सो.कांबळे
परळी वैजनाथ जि.बीड
हो.नं.9860806747.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने