नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

नायलाँनचा दोर

Mahendra Mahore's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखनस्पर्धा-२०१४
लेखनविभाग: 
पद्यकविता

""""""""""बळीराजा""""""""""

माया पयाटीनं तुरीनं लावला
माया जीवाले बेज्जा घोर..
म्हटल आता बळीराजा
बनशील कास्तकाराचा पोरं...! ||1||

पयाटी तं माई सुरवातीला
जशी होती चंद्राची कोर..
आता पडली माई पयाटी
बुळापासुन पुर्ण लालभोर...! ||2||

गेला तीच्यावर आता लाल्या
माया जीवाले लावला घोर..
अशी माई पयाटी होती लहान
बोंडे होते तीले भरपुर महान...! ||3||

अशी माया पराटीची गाथा
सांगता सांगता सरत नाई..
तुरीच पिक मले आता
कसच काही पुरत नाही...! ||4||

अवंदा लावला पिकानं
बळीराजाच्या गळ्याले दोर..
ईचार करुण थकला बळीराजा
शेवटी झाडाला बांधतो
वावरातचं नायलाँनचा दोर...! ||5||

महेंन्द्र माहोरे
शिवणगांव ता.तिवसा
जि.अमरावती
-----------------------

Share

Comments

Layout Settings