नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*एप्रिल फुलचा समाचार*
एप्रिलच्या फुला मागून शुभ समाचार आला
नास्तिक गेला काशीला अन् गंगेमध्ये न्हाला
प्रतिपुरो गामीवामी पाण्यावरची छाया
ज्ञानग्यान वंतजंत मोहभरली माया
चीरसत्य नसते काही इतके कळले त्याला
नास्तिक गेला काशीला अन् गंगेमध्ये न्हाला
ऋतुजा असते तशी त्याची जसा ज्याचा ऋतू
खीर मनाची शिजल्यावरती प्रज्ञा जाते उतू
मिथ्यत्वाच्या गहराईचा तळ दिसला त्याला
नास्तिक गेला काशीला अन् गंगेमध्ये न्हाला
आस्तिक नास्तिक खेळ मनाचे बाकी काही नसते
चराचराला अद्भुत शक्ती सदैव व्यापून असते
अभय कळता गमक इतुके भानावरती आला
नास्तिक गेला काशीला अन् गंगेमध्ये न्हाला
- *गंगाधर मुटे "अभय"*