नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
संघर्ष
सलग तिसऱ्या वर्षीही
बापानं दुबार पेरणी केली,
दीडीनं कर्ज आणून
डवरणी, फवारणी केली..
पिक जोमात असतांना
आस्मानी संकट आलं,
तणकट सोडून सारं घेऊन गेलं
गारपिटीनं तूर अख्खी लंबी झाली..
शेवटी,
होती नव्हती सोयाबीन सोंगली
बोन्डअळी न सोडलेला कापूस वेचला
अन यंदाही मिळेल त्या भावात विकला..
एवढ्यात,
मुलगा डिग्री पूर्ण करून आला होता,
बापानं त्याला सहज विचारलं
नोकरीपाण्याचं जमलं का ?
त्यावर मुलगा त्वेषात म्हणाला,
नोकरी झाडावर लागत नाही
त्यासाठी संघर्ष करावा लागतो..
दाढी वाढलेल्या चेहऱ्याने मुलाकडे बघून,
बाप मिश्किलपणे हसला,
अन यंदाच्या वाहीसाठी वावरात निघून गेला..!!
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.