![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बाबा आपली शेती
कव्हा पिकणार
एका दमडीत
मी कसा शिकणार
हसुन म्हणता हा नाही तो माल
सोन्यासारखा खपणार
बाबा तुम्हीच सांगा आजुन
किती दिस शाळा माझी चुकणार
अभिमानानं तुम्ही म्हणता मोठं मोठी
लोक आपली भाजी खातात
बाजारभाव करून तेच
एक एक रुपया कमी देतात
बाबा कधी येतो दुष्काळ
आपली शेती राहते उपाशी
बोकांडी घेऊन ठेवता बी बियाणे
स्वप्नात राहते फुलणारी कपाशी
जु जाडी तासुन तुम्ही
हेरीत असता भरलेलं आभाळ
रब्बी खरीप वाहुन जात
उरत नाही कुढं काडीचही गबाळं
तरीही खचत नाही
करता तुम्ही दुबार पेरणी
छाती ठोकून सांगत असता
भरभरून देईल माय माझी धरणी,
मग मी ही म्हणतो एक दिस
मी मोठ्या शाळेला जाणार
शिकुन मोठा बळीराजा होणार
माझ्या काळ्या आईची काळजी
मीच घेणार.
बाबा खरचं माझं
उद्याच भविष्य म्हणजे शेती
म्हणूनच बाबा माझा शेतकरी म्हणताना
फुगते माझी छाती.
Dnyaneshwar