नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बळी झालाय सावज..
दिस कसे हे बळीचे
कुठं गेली त्याची शान।
वियख्यात करजाच्या
गेली समदी आन बान।
त्यानं करज घेऊन
दाने पेरले शिवारी।
केला घात दुसमानानं
हाती पसाभर जवारी।
बोंडअळीचं थैमान
झाली पऱ्हाटी बेजार।
पांढऱ्या सोन्यासाठी
किती घेतलं उधार।
पोटापाण्याचा ह्यो प्रस्न
कसा सुटावा अशानं।
लेक आलीया वयात
कशी उजवावी त्यानं।
धुऱ्यावर शिवाराच्या
बोरी बाभळी वाढल्या।
त्याच्या काट्यावरी यानं
याच्या कायज्या टांगल्या।
सावकाराचा तगादा
मांग सकाय दुपारी।
बळी झालाय सावज
सावकार त्यो शिकारी।
चित्रा कहाते
नागपूर
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!