Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.

none
८ वे अ.भा.म.शे.सा.संमेलन : कार्यक्रमपत्रिका

आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने || रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने ||
जेव्हा चहूदिशांनी | वादळ विराट तेव्हा || द्यावे अभय दिव्याला | जळण्यास लेखणीने ||
 
logoआठवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, रावेरी
दिनांक : रविवार, २७ फेब्रुवारी २०२२
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, भूमीकन्या सीताकुटी
रावेरी ता. राळेगाव जि. यवतमाळ
 
        कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्‍या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून आठवे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
 
कार्यक्रमाची रुपरेषा
 
सकाळी ०७.०० ते ०७.३० : ग्रंथ दिंडी
सकाळी ०७.३० ते ०८.०० : अग्रीम नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना प्रवेश पास वितरण 
(वेळेवर नवीन नोंदणी केली जाणार नाही.)
 
सकाळी ०८.०० ते ११.०० : उद्घाटन सत्र
 
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, उद्‍घाटन आणि स्वागतसमारोह
 
संमेलनाध्यक्ष : मा. प्रज्ञाताई बापट, ज्येष्ठ शेती साहित्यिक
उदघाटक : मा. संजयजी पानसे, ट्रस्टी, शेतकरी संघटना ट्रस्ट
स्वागताध्यक्ष : मा. सरोजताई काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेत्या  
प्रमुख अतिथी : मा. मा. कैलास तवार, औरंगाबाद 
विशेष  अतिथी : मा. सिंधुताई इखार
सन्माननीय अतिथी : मा. सरपंच, ग्रा. पं. रावेरी
कार्याध्यक्ष : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष
संयोजक : मा. बाळासाहेब देशमुख, ट्रस्टी, सीतामंदीर, रावेरी
सूत्रसंचालन : मा. प्रा. मनीषा रिठे, पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष
 
शेतकरी नमनगीत : गुरुराज राऊत , गणेश मुटे,  तेजू कोपरकर, विवेक मुटे
 
सत्र - २ : दुपारी ११.०० ते १२.३० : शेतकरी कवी संमेलन
 
अध्यक्ष : मा. धनश्री पाटील (नागपूर)
सूत्रसंचालन : मा. जयश्री नांदे (पुणे), मा. लक्ष्मी बल्की (यवतमाळ)
सहभाग :  मा. तुळशीरामजी बोबडे, मा. सु.पुं.अढाऊकर मा. हिंमतराव ढाळे, मा. अनिकेत देशमुख, मा. शिवलिंग काटेकर, मा. श्याम ठक (अकोला), मा. राजेंद्र फंड (अहमदनगर),  मा. खुशाल गुल्हाणे मा. विनायक अंगाईतकर, मा. रत्नाकर वानखडे, मा. दिलीप भोयर (अमरावती), मा. प्रदीप देशमुख (चंद्रपूर), मा. रवींद्र दळवी, मा. रावसाहेब जाधव (नाशिक),  मा. लक्ष्मण लाड, मा. मुक्तविहारी,  मा. सिद्धेश्वर इंगोले, मा. बालाजी कांबळे, (बीड), मा. कृष्णा जावळे, मा. मारोती कुळसंगे (बुलडाणा),  मा. भूषण तांबे (मुंबई),  मा. प्रा. महेश कोंबे, मा. निलेश तुरके, मा. सचीन शिंदे, मा. राजेश अंगाईतकर (यवतमाळ), मा. संदीप धावडे, मा. नरेंद्र गंधारे, मा. रंगनाथ तालवटकर, मा. नारायण निखाते (वर्धा) मा. प्रा. संजय कावरे (वाशीम) श्री वासुदेव खोपडे (अकोला)
=======
दुपारी  १२.३० ते ०१.३० : मध्यावकाश (स्नेहभोजन)
====== 
सत्र - ३  : ०१.३० ते  ०२.४५ : महाचर्चा - आरोप-प्रत्यारोप
विषय : दिल्ली शेतकरी आंदोलनाने काय कमावले; काय गमावले.
 
अध्यक्ष : मा. शैलजाताई देशपांडे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या
सहभाग : मा. अनिल घनवट राष्ट्रीय अध्यक्ष, स्वभाप
: मा. ललित बहाळे अध्यक्ष, शेतकरी संघटना
: मा. डॉ. आदिनाथ ताकटे मृदशास्त्रज्ञ, राहुरी विद्यापीठ
: मा. दिनेश शर्मा माजी अध्यक्ष, स्वभाप
: मा. मधुसूदन हरणे प्रदेशाध्यक्ष, स्वभाप
: मा. सीमा नरोडे प्रदेशाध्यक्ष, महिला आघाडी
सूत्रसंचालन : मा. जगदीश भगत आकाशवाणी निवेदक  
 
सत्र - ४  : ०२.४५ ते  ०४.०० : शेतकरी गझल मुशायरा
 
अध्यक्ष : मा. प्रा. चित्रा कहाते, नागपूर
सूत्रसंचालन : मा. अझीझखान पठाण, (नागपूर)
सहभाग : मा. बापू दासरी, मा. चंद्रकांत कदम (नांदेड), मा. राजू आठवले (औरंगाबाद)  मा. आत्माराम जाधव, मा. आत्तम गेंदे, मा. यशवंत मस्के (परभणी), मा. मसूद पटेल (पुणे),  मा. प्रा. डॉ. सिद्धार्थ भगत,  मा. विनय मिरासे,  मा. गजेंद्रकुमार ठुने, मा. रमेश बुरबुरे (यवतमाळ), मा. संजय तिडके (लातूर),  मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर) मा. निलेश कवडे (अकोला), मा. बाळ पाटील (उस्मानाबाद), मा. वीरेंद्र बेडसे (धुळे), मा. सतीश मालवे (अमरावती), मा. डॉ.राज रणधीर (जालना),  मा. दिवाकर जोशी, (बीड)
**************
 
पारितोषिक वितरण समारंभ व समारोपीय सत्र
 
सत्र - ५  :  दुपारी ०४.०० ते ०५.३०
 
विषय - कधी संपणार सीते..... तुझा वनवास!
 
अध्यक्ष : मा. गीता खांडेभराड, ज्येष्ठ शेतकरी नेत्या
प्रमुख अतिथी : मा. अ‍ॅड. वामनराव चटप, ज्येष्ठ शेतकरी नेते
विशेष अतिथी : मा. अ‍ॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट
: मा. अ‍ॅड प्रदीप पाटील, मुंबई हायकोर्ट
सन्माननीय अतिथी : मा. विजय निवल, शेतकरी नेते
: मा. कडुआप्पा पाटील, शेतकरी नेते
: मा. दिलीप भोयर, शेतकरी नेते
: मा. सिंधुताई इखार, शेतकरी नेत्या
 
बळीराजाच्या आरतीने समारोप
======
सीतामंदीर स्थळ परिचय 
 
रावेरी हे गांव यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव वरुन दक्षिणेस ३ कि.मी आहे. यासंबंधात अशी आख्यायिका सांगितली जाते की, जेव्हा रामाने सीतेला गरोदर अवस्थेत वनात सोडून दिले तेव्हा सीतेने याच रावेरी गावात वाल्मिकॠषिचे आश्रयाने वास्तव्य केले. रावेरी हे गाव आणि आसपासचा परिसर हा दंडकारण्याचा भाग असून याच गावात लव आणि कूश यांचा जन्म झाला. रामाचा अश्वमेघ नावाचा घोडा लव-कुशांनी अडविला आणि त्या घोड्याबरोबरोबर आलेल्या शत्रुघ्न, लक्ष्मण यांचा पराभव करून घोड्याबरोबर आलेल्या हनुमंताला वेलीने बांधून ठेवले. रावेरी गावात वेलीने बांधलेल्या स्थितीतील ९ फ़ूट उंचीची हनुमंताची भव्य मुर्ती आहे. ज्या ठिकाणी लव-कुशांनी अश्वमेघ घोडा पकडला ते ठिकाण तमसा नदीचे (रामगंगा) तीरावर आजही पाहण्यास मिळते. गावाच्या दक्षिण भागाकडून तमसा (रामगंगा) नदीचे वळण असून उत्तर वाहनी असलेल्या नदीचे तिरावर जगातील एकमेव वनवासी सीतेचे हेमाडपंथी मंदीर आहे. तसेच बाजुला वाल्मिक ऋषिचा आश्रम सुद्धा आहे. शिवाजी महाराजांचे कालखंडातील पाच मोठे बुरूज (गढी) व त्याला भिंतीचा असलेला परकोट आजही पाहण्यास मिळतो.
 
         अशा पौराणिक इतिहास असलेल्या गावात शेतकरी संघटनेचे प्रणेते युगात्मा शरद जोशींनी २ मे १९८२ ला भेट देऊन संपूर्ण इतिहास जाणून घेतला आणि मंदीराचा जिर्णोद्धार केला. एका शेतकरी राजाची भूमीकन्या व रामासारख्या सार्वभौम राजाची राणी असलेल्या सीतेने वनवासात राहूनही आपल्या दोन मुलांचा धैर्याने सांभाळ केला. त्यामुळे स्त्रीत्वाचे आत्मभान, आत्मसन्मान आणि आत्मबळ जपणारी स्फूर्तिदायक पावनभूमी म्हणून रावेरी मंदिराचे एकमेवाद्वितीय आगळेवेगळे स्थान आहे.
 
====
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१
लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : श्री बापू दासरी (नांदेड), श्री प्रदीप देशमुख (चंद्रपूर), सौ. धनश्री किशोर पाटील, सौ. माधुरी कळंबे, अझीझखान पठाण (नागपूर), प्रा. मनीषा रिठे, श्री संदीप धावडे दहिगांवकर, श्री रामेश्वर काकडे (वर्धा), श्री. राजेंद्र फंड (अहमदनगर), श्री सुधीर बिंदू (परभणी)
 
अनुभवकथन : १) भूषण तांबे, मुंबई २) सतीश मानकर, वर्धा ३) लक्ष्मण लाड, बीड 
वैचारिक लेख : १) सुनिता कोंमावार, बीड २) आदिनाथ ताकटे, अहमदनगर
ललितलेख : १)  कृष्णा जावळे, बुलडाणा २) गणेश वरपे, जालना
रसग्रहण-समीक्षण : १) मुक्तविहारी, बीड २) किरण डोंगरदिवे, बुलडाणा ३) निलेश कवडे, अकोला 
पद्यकविता : १) राजेश अंगाईतकर, यवतमाळ २) खुशाल गुल्हाणे, अमरावती ३) विनायक अंगाईतकर, अमरावती 
छंदोबद्ध कविता : १) रवींद्र दळवी, नाशिक २) दिवाकर जोशी, बीड ३) अनिकेत देशमुख, अकोला
छंदमुक्त कविता : १) रावसाहेब जाधव, नाशिक २) धीरजकुमार ताकसांडे, वर्धा ३) नरेंद्र गंधारे, वर्धा
गीत रचना :  १)बालाजी कांबळे, बीड २) रंगनाथ तालवटकर, वर्धा 
शेतकरी गझल : १) चंद्रकांत कदम, नांदेड २) डॉ. रविपाल भारशंकर, वर्धा ३) प्रदीप थूल वर्धा
 
आयोजन समिती :
स्वागताध्यक्ष : मा. सरोजताई काशीकर
संयोजक : मा. बाळासाहेब देशमुख
कार्याध्यक्ष : मा. गंगाधर मुटे
 
आयोजन समिती : श्री. जयंत बापट (अध्यक्ष), श्री. इंदरचंद बैद, श्री. हेमंत ठाकरे, श्री. बबनराव चौधरी, श्रीमती सोनाली मरगडे, श्री. इंदल राठोड, श्री. नामदेवराव फटिंग, डॉ शामसुंदर गलाट, श्री. रमेश मांगुळकर,  श्री.  विक्रम फटींग, श्री.नामदेवराव फटींग, श्री.किशोर पाटील झोटिंग, श्री उद्धवराव हेपट, श्री पुंडलिकराव येंगडे,  श्री पंढरीनाथजी बोथले, श्री किसनराव पावडे, श्री किसनराव ठाकरे, श्री पंढरीनाथ पाटील काकडे, श्री ज्ञानेश्वर येनोरकर (यवतमाळ), श्री. शिवाजीराव शिंदे (नांदेड), श्री. अरविंद तायडे (अकोला), श्री. गुलाबसिंग रघुवंशी (धुळे), श्री. रमेश खांडेभराड, श्री. रामेश्वर अवचार (परभणी), श्री. अनिल चव्हाण (पुणे), श्री. देविदास पाटील कणखर (बुलडाणा), श्री. शीतल राजोबा (सांगली), श्री. निवृत्ती कर्डक (नाशिक),  श्री. रुपेश शंके (लातूर), श्री. उल्हास कोटंबकर (वर्धा), श्री. पंडीत बाजीराव आटाळे (जळगाव)
 
नियोजन समिती : श्री. राजेंद्र झोटींग (अध्यक्ष), श्री. देवराव धांदे, श्री. बाबु पाटील चौधरी, श्री. हिंमतराव देशमुख,  श्री. कृष्णराव भोंगाडे, श्री. अविनाश पोळकट, श्री. नागोराव पाटील, श्री.नाना खांदवे, श्री. गुल्हाने, श्री. भास्करराव महाजन, श्री. बाबा कोकेवार, श्री. दीपकअण्णा आनंदवार, श्री. रेणूराव बुटले, श्री. नागोराव पाटील, श्री. गोपाल भोयर, श्री. गजानन ठाकरे, श्री. होमदेव कन्नाके, श्री. दशरथ खैरे,  (यवतमाळ) श्री. मदन सोमवंशी (लातूर), श्री. दगडूजी शेळके (जळगाव), श्री. सोपान संधान, श्री नजमोद्दीन शेख (नाशिक) श्री. सुधाकर गायकी (अमरावती), श्री.सुभाषराव बोकडे, श्री.रवींद्र खोडे, श्री.गजाननराव इखार, श्री प्रभाकरराव झाडे, श्री.प्रकाशराव कोरेकर, श्री.मुकुंद खोडे, श्री.भारत लाखे (वर्धा)
 
स्वागत समिती : श्री. राजेंद्र तेलंगे (अध्यक्ष),  श्री. नीतीन पु. देशमुख, श्री. दशरथ बोबडे,  श्री. चंद्रशेखर देशमुख,  श्री. डॉ. विजय चाफले,  श्री. मनीष जाधव,  श्री. सैना  गरुड,  श्री. देविदास काळे,  श्री. अक्षय महाजन,  श्री. देवेंद्र राऊत,  श्री. घनश्याम कापसे,  श्री. सूरेश आगलावे (यवतमाळ), प्रा. कुशल मुडे (मुंबई), ऍड्. प्रकाशसिंह पाटील, (औरंगाबाद), श्री. माधव कंदे (लातूर), श्री. वामनराव जाधव (बुलडाणा), श्री.अरविंदराव बोरकर (वर्धा), श्री. जगदीशनाना बोंडे, श्री ललित जैस्वाल, श्री नंदकिशोर खेरडे (अमरावती), श्री. समाधान कणखर (बुलडाणा), श्री. सतीष देशमुख (अकोला), श्री. हेमंत चौधरी (नंदुरबार), श्री. प्रमोद तलमले, श्री.गुरुराज राऊत, (वर्धा)
 
व्यवस्थापन समिती : श्री. वामनराव तेलंगे (अध्यक्ष), श्री. नामदेवराव काकडे,  श्री. वैकुंठराव मुंढे, श्री दुर्वेश उमाटे, श्री. महेश सोनेकर, श्री. उध्दवराव चौधरी, श्री. बबनराव धोटे, श्री. विनोद काकडे, श्री. सुधाकर काकडे, श्री. अविनाश शेळके, श्री. चंद्रकांत गोहणे, श्री. प्रविण झोटींग, श्री. मोहन हिवरे (यवतमाळ), श्री. जगन्नाथराव काकडे (औरंगाबाद),   श्री.दत्ता राऊत,  श्री.धोंडबा गावंडे, श्री. सचिन डाफे, श्री.गजानन इटनकर, श्री. मुकेश धाडवे, श्री. हनुमान दारुणकर, श्री. अशोक कातोरे, श्री महादेव धरमुळ (वर्धा)
 
सभागृह व्यवस्था समिती : श्री. गणेश मुटे (अध्यक्ष), श्री.प्रविण पोहाणे, श्री. अक्षय मुटे, कु. वैष्णवी अंड्रस्कर, श्री. विनोद काळे, शुभम मुटे, शिवम मुटे, सुहास भोमले,  कु. कल्याणी काळे, कु. रेणू कोपरकर, कु. श्रेया मुटे, क्षितिज काळे, प्रणय कापसे, प्रणव परमोरे, यश वाघमारे, तेजस वाघमारे, आदित्य भोमले 
 
स्वागत कक्ष समिती : श्री. सारंग दरणे (अध्यक्ष), श्री नरेश नरड, श्री.अरविंद राऊत, श्री. राजेश भोमले, श्री. सौरभ मुटे
==============

Sanmelan

 


Sanmelan

******


******
रावेरीला कसे पोचावे?

रेल्वेने येणारांसाठी : 
रेल्वेने येणाऱ्यांनी वर्धेला उतरावे. 
१) वर्धेवरून राळेगाव बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात. राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
२) वर्धेवरून कळंब आणि कळंबवरून राळेगाव.  बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात.  राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.

बसने येणारांसाठी :
नागपूर, भंडाऱ्यावरून येणाऱ्यांनी हिंगणघाटला यावे.
१) हिंगणघाटवरून वडकी बस, ट्रॅव्हल्स, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात.
२) वडकीवरून राळेगाव  बस, ट्रॅव्हल्स, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात  राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****
१) चंद्रपूर, गडचिरोलीवरून  येणाऱ्यांनी करंजीमार्गे वडकीला यावे.
२) वडकीवरून राळेगाव  बस, ट्रॅव्हल्स, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात  राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****
१) अकोला, औरंगाबाद, पुणे कडून येणारांनी वर्धा किंवा यवतमाळला यावे.
२) यवतमाळ वरून कळंब आणि कळंबवरून राळेगाव.  बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात.  राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****
नांदेड, बीड, लातूर, सोलापूर कडून येणाऱ्यांनी  यवतमाळला यावे.
२) यवतमाळ वरून कळंब आणि कळंबवरून राळेगाव.  बस, टेम्पो, जीप, कालीपिली मिळतात.  राळेगाववरून रावेरीसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध आहे.
****

बस टाइम
******

 

Share

प्रतिक्रिया