Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कोरोना काळात सार्थ ठरली पोशिंद्याची व्याख्या...

लेखनविभाग: 
ललितलेख

कोरोना काळात सार्थ ठरली पोशिंद्याची व्याख्या...

२०११ मध्ये झालेल्या १५ व्या जनगननेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी नोंदवली गेली असली तरी २०१९ मध्ये ती १३३ कोटीच्या पुढे गेलेली असून सेन्सस ऑफ इंडिया या जनगनना करणाऱ्या संस्थेच्या अंदाजानूसार २०२१ मध्ये ही आकडेवारी वाढत जाणार आहे. जगात लोकसंखेच्या दृष्टीने चिनचा प्रथम व भारताचा दुसरा क्रमांक लागतो. एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात जर एखांदा साथीचा रोग आला, निर्माण झाला तर काय होईल. अश्या प्रकारच्या आजाराला नियंत्रित करण्यासाठी तेवढी सक्षम यंत्रणा राज्यवार तरी आपल्या देशात आहे का? तर त्याचे उत्तर गेल्या सहा महीन्यापासून आपण सर्व पाहत आहोतच.वस्तुनिष्ठपणे सर्वकष आढावा घेत्तला तर प्रत्येकाचे उत्तर नाही असेच येणार. ते सत्यही आहेच.आता येणाऱ्या काळात प्रत्येकाने आत्मनिर्भर व्हावे या सारख्या आवाहनातूनही गंभीर परीस्थितीची आणी काहीश्या हतबलतेची कबुली दिल्या गेलेली आहेच.

आपल्या देशातील ७० टक्के जनता ही खेड्यात राहणारी आहे. म्हणजे “खरा भारत देश खेड्यात राहतो” या प्रमाणे विचार केला तर, मुख्य व्यवसाय अजून तरी शेतीच आहे. त्यातही अल्पभुधारकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे,प्रामुख्याने जिविकेचे साधनही शेती आणी तत्सम पुरक व्यवसायावरच अवलंबून आहे.२४ मार्चला रात्री ८ वाजता जेव्हा, दूरचित्रवाहिनीवरून पुढील एक महीन्याकरीता संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. तेव्हा होऊ शकते, काही गावात तर लोडशेडींगमुळे लाईटही नसेल.त्यामुळे एवढ्यामोठ्या घोषणे बाबत देशातील काही भागात अनभिज्ञताही असू शकते. सकाळी उठल्यावर शिरस्त्याप्रमाणे गाव शेतीच्या कामातही लागले असेल. केव्हातरी दुपारी, सायंकाळी एवढी जगण्यामरणाची बातमी, त्यांच्या पर्यंत पोहचली असेल.बाकी जंगल.पहाडी दुर्गम अश्या भागातील आदिवासी पाड्या वस्त्याची तर गोष्टच निराळी.दूसऱ्या दिवसापासून एस्टी, बस, वर्तमानपत्रे बंद झाल्याने आणी येणाऱ्या बातम्या ह्या फक्त दूरचित्रवाहिनी तसेच हाट्सअप्स, फेसबुक,इन्स्टाग्राम, सारख्या तत्सम संवादाच्या माध्यमाव्दारेच प्रसारित होत होत्या.त्यातही कोरोना संबधीत बाहेरील देशातील, विशेषत: चीन मधील वूहान,इटली या शहरातील व्हीडोओ प्रचंड व्हायरल होत होते. कोरोना आजारा बध्दल माहिती ही प्रामुख्याने फक्त इलेक्त्रोनिक मिडीया व्दारे सर्वसामान्या पर्यंत पोहचत होती. ती माहिती कितपत खरी मानावी, हा संभ्रम तर आजही कायम आहेच.

आजकाल ग्रामीण भागात काही प्रमाणात सोईसुविधा जरी निर्माण झाल्या असल्या, तरी प्रामुख्याने अनेक बाबतीत शहराशिवाय पर्याय नसतो. पुन्हा आदीवासी भाग, जो संपूर्णणत: नैसर्गिक शेतीवरच अवलंबून असतो, त्यांचा तर विचारही करू शकत नाही. विशेषत: शेतीविषयक साधन सामुग्री,अवजारे, खते,बी-बियाणे,तणनाशक औषधे. पुन्हा शेतमालाच्या प्रत्यक्ष विक्रीकरीता,कृषीउत्त्पन्न बाजार समित्या, अडते, भाजीपाला मार्केट,लहान मोठ्या व्यापारी करीता तर शहराशीवाय पर्यायच नसतोच. कोरोनाच्या आपत्तीला सर्वात प्रथम सामोरे जावे लागले ते भाजीपाला आणी फळे दुध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला. भाजीपाला दुधा हे नाशिवंत असल्याने, वेळेतच बाजारात नेऊन विकावेलागतात. सोबतच शेतीस पूरक असलेल्या दुध उत्पादन व कुक्कुटपालन ह्या व्यवसायास. जनसामान्यातील कोरोना बाबत होत असलेल्या चर्चेतून, प्राप्त अपुऱ्या माहितीमधून, झालेल्या गैरसमजामुळे तर फार मोठा फटका बसला होता. कोरोना विषाणू हा शिजवलेल्या अन्नातून पसरत नाही.तरीही मटण चिकन आणि अंडी ह्यांच्या विक्रीवर विपरीत परिणाम झालाच. नाशिक येथे अक्षरश: चिकन २५ रु.किलो, या दराने विक्रीची पाळी आलेली होती. हॉटेल, भोजनालये, लग्न समारंभाना परवानगी नाकारल्याने भाजीपाला, फुले यांच्या किरकोळ विक्रीवरही विपरीत परीणाम झालेला आहेच.

बीबीसी महाराष्ट्र या वाहिनीवरील मुलाखतीत, युवा शेतकरी, श्री.ओंकार गाडे, रांझणी, जिल्हा सोलापूर, यांची व्यथा तर ग्रामीण भागातील कोरोना वास्तवाचा गंभीर परिणाम, पुराव्यासह दाखवत होती. तीन एकर शेतीत, कलिंगड लावगडी करीता एकूण ७००००/- रुपये खर्च झालेला होता. ही रक्कम कर्जावर घेतलेली असल्यामुळे, मुदतीत परतफेड करणेही क्रमप्राप्त होतेच.आंबा बाजारात दाखल होण्याआधी कलिंगडे विक्रीस जाणे आवश्यक असल्याने,धावपळीत मार्चच्या पहिल्या आठवड्यात फक्त एकच कलिंगडाची गाडी बाजारात पाठवीण्यात आलेली होती.त्याचे त्यांना केवळ २००००/- मिळाले होते.पुढे अचानक लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे, मार्केट बंद आणी वाहन चालकास अनेक गावांनी,गावबंदी जाहीर केली असल्याने व काहीनी प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून, स्वत:हून घरीच थांबण्याचा निर्णय घेतल्यामुळे, वाहनाची व्यवस्था होऊ शकली नाही. उर्वरीत सर्व कलिंगडे अक्षरक्ष: वावरात सडून गेली.रोख ५००००/- रूपयाचा फटका एका अल्पभूधारक शेतकऱ्यास बसलेला होता. माझे मित्र प्रा. महादेव लुले व गझलकार श्री.रमेश सरकाटे सर यांच्या ऐन भरात असलेल्या लिंबू बागाचे अश्याच प्रकारचे नुकसान झालेले होते.अश्याच प्रकारे द्राक्ष,केळी,डाळिंब, मोसंबी, संत्री, पपई, अश्या प्रकारच्या फळ पिकात मोठी आर्थिक गुंतवणूक झालेली असल्यामुळे ते नुकसान कसे भरून काढावे हा प्रश्न आहेच.

यावर्षी मृग नक्षत्रात पावसाने दमदार सुरवात केल्यामुळे, कोरोना काळातही शेतकऱ्यात चैतन्याच वातावरण निर्माण झालेलं होत, पण शेतकरी जेव्हाही काही स्वप्न बघतो तेव्हा, त्याला नजर लागतेच. एका एका बीयान्याच्या थैलीसाठी सुरक्षित अंतर ठेवत, बीयाणे खरेदी करून, अगदी जीव मुठीत घेवून पेरणी केली. त्यातही बऱ्याच ठिकाणी बीयाणे बोगस निघाल्याने, सुलतानी संकटाने पुन्हा डाव साधलाच. आता पुन्हा पावसाने, नको तेवढा जोर धरल्यामुळे सोबत सोयाबीन सारख्या पिकावर खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने, पुन्हा शेत मालाच्या प्रतवारीवर विपरीत परिणाम होणार आहेच.
शहरात रोजगाराकरिता गेलेल्या ग्रामीण युवकास या आपत्ती मुळे आपल्या मूळगावी परतावे लागले. आणी आता शहरात काही खरे नाही, म्हणून शेतीकडे मोठ्या आशेने बघतो.परंतू आजची शेती ही बऱ्याच प्रमाणात, कुटुंबातील कलहामुळे एकसंध राहिलेली नाही.त्यामुळे वाट्यास आलेल्या जेमतेम शेतीत, पुढे कसा निभाव लागणार ही चिंता नक्कीच वाढली आहेच. आता अश्या स्थलांतरीत झालेल्या युवकांकरीता, गावात जो पर्यत पर्यायी रोजगाराची निर्मिती होणार नाही, तोपर्यत हे कोरोनाचे संकट तसेच राहणार. मुळात शेतीकरणे ही सामुदायिक प्रक्रिया आहे. ज्यात पेरणी पासून कापणी आणी मशागती पासून पुन्हा पेरणी पर्यत, लोकांच्या सहभागाशीवाय, कोणतीही कामे करणे अशक्यच आहे. आता माणसा माणसात, अंतर ठेवून, कसे काय ते पार पाडतील, हे येत्या काळातील एक आव्हान ठरणार आहे.

कोरोना काळातील सुरवातीच्या दिवसात बऱ्याच शेतकऱ्यानी अत्यावश्यक वाहतुकीचा परवाना काढून भाजीपाला फळे आपल्या वैयक्तिक संपर्कावर थेट घरपोच देण्याचीही व्यवस्था केली होती.आमच्या सोसायटीतही आठवडयातून दोन दिवस,आम्ही परीचयातील शेतकऱ्याशी संपर्क करून वीस कुंटूबाकरिता भाजीपाला फळे बोलावीत होतो. कोरोनाकाळातील शेतकरी ते थेट ग्राहक अश्या प्रकारे यशस्वी ठरलेली वितरणाची व्यवस्था पुढील काळातही सक्षमपणे राबवू शकतो.शेतीकडे व्यवसाय म्हणून बघण्याचा दृस्टीकोनही कोरोनाने शिकविला आहे.जेव्हा सर्वत्र बंद होतं.तेव्हा फक्त शेतकरी राबत होता. मानवाला जगण्या करीता फक्त आणी फक्त अन्नाचीच आवश्यकता असते आणी अन्न निर्मिती करीता,शेती शिवाय पर्याय नाही.जगाचा पोशिंदा ही सार्थ व्याख्या कोरोनामुळे खऱ्या अर्थाने समाजालाही कळायला लागलेली असून, आता ती सर्वमान्य झालेली आहेच.शेतकरी,शेती त्याच्या कष्टाप्रती समाजातही आता, अन्नदाता अशी कृतज्ञतेची भावना निश्चितच वृध्दिगत झाल्याचे जाणवत आहे.या काळात ग्रामीण भागातील अनेक संवेदनशील मनाच्या कवी मित्रांनी, कोरोना वास्तवाचे शब्दांकन, आपल्या लेखनीतून मांडलेले आहेच.शेतीमातीतील वास्तवा संबधीत जाणीवा जागृतीचा सकारात्मक परिणाम होत आहेत. स्वत: शेतकरी असलेल्या श्री.गंगाधर मुटे सरांनी “कोरोना महात्म” या लेखमालेतून, कोरोना आणि शेती सोबत, एकूणच समाज जीवनावरील संभाव्य परीणामा बाबत,अनेक पैलूवर अतिशय मार्मिकपणे भाष्य केलेले आहे.कोरोना काळात शेतकऱ्याने फक्त जगाला जगण्याकरिता अन्नच दिले नाही, तर या संकटाचा सामना करण्याकरीता, समर्थ लेखणीतून सकारात्मकपणे समाजमनाची मशागतही केली.

जेव्हा आपण सर्व, एका वेळी समान प्रकारच्या संकटाचा सामना करीत असतो, किंवा एखांद्या विपरीत परिस्थीतीशी संघर्ष करीत असतो, तेव्हा एक दुसऱ्याच्या दु:खाची धग समजून घेणे, पर्यायाने सोपे होत असते. आपण स्वत:ला त्या ठिकाणी ठेवून परीस्थीतिकडे बघत असतो. कोरोना संकट, येत्या काळात परीणामकारक लस उपलब्ध झाल्यावर संपुष्ठात येईलही .सर्व पूर्ववत होईलही. पण या काळात शेतकऱ्यानी बजावलेल्या अन्नदात्याच्या भूमिकेने, कोरोना काळात पोशिंदा या शब्दाची व्याख्या सार्थ ठरविली आहे.

रवीन्द्र अंबादास दळवी,
२०२० श्री. वल्लभ अपार्टमेंट
विधाते नगर नाशिक
७०३८६६९५४२

Share

प्रतिक्रिया