Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***साठी बुद्धी नाठी : भाग - १

लेखनप्रकार : 
साठीचे हितगुज
वाङ्मयशेती: 
आयुष्याच्या रेशीमवाटा
साठीचे हितगुज
साठीचे हितगूज  : भाग - १
साठी बुद्धी नाठी 
 
            शालेय दस्तावेजाच्या तारखेनुसार दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मी साठी ओलांडून एकसष्टीत प्रवेश केला. त्याच दिवशी रावेरी येथील आठव्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या आयोजन-नियोजनात मी अतिव्यस्त असल्याने कुणाचेच फोन कॉल उचलू शकलो नाही. फेसबुक-व्हाटसप बघू शकलो नाही. संमेलनाचे फेसबुक लाईव्ह करायचे असल्याने फेसबुकवॉल लॉक करून ठेवावी लागल्याने मित्रमंडळी, स्नेही-आप्तजनांचे माझ्यापर्यंत पोचण्याचे मार्गही बंद करावे लागले. त्यामुळे मी सर्वांची जाहीर माफी मागतो आणि सार्वजनिक कार्य करताना खाजगी आयुष्य विसरून जायचे असते व आपल्या मुख्य उपक्रमावर लक्ष केंद्रित करायचे असते याला  मित्रमंडळी, स्नेही-आप्तजन दुजोरा देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
            दोन दिवस उलटल्यानंतर मागे वळून पाहताना आज मला जाणवतंय कि साठी ओलांडून एकसष्टीत पदार्पण करण्याच्या दिवशी माझ्या मनात कुठल्याही भावना नव्हत्या; ना आनंद, ना दुःख. वय वाढत जाणे आणि आयुष्याच्या अस्ताकडे एक एक पाऊल टाकणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. वाढत्या वयोमानानुसार अनुभव संपन्नता वाढत जाणे ही सुद्धा ओघानेच येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे असे माझे आजवर मत होते परंतु बहुतेक या मताला मानवी जीववैविध्याची मान्यता नसावी कारण साठीनंतर बुद्धी नाठी होते, या मताला समाजात व्यापक मान्यता मिळाली आहे. अनुभवसंपन्नतेमुळे बुद्धी आणखी तीक्ष्ण, धारदार आणि प्रगल्भ व्हायला हवी, पण तसे न होता नेमके उलट का होत असावे, याविषयी याप्रसंगी व्यापक चिंतन करायची मला गरज भासायला लागली आहे. या चिंतनात आपल्याला सामावून घेऊन व्यापक सामुदायिक चिंतन करण्यासाठी हा लेखप्रपंच.
            विषयाचा नीट उलगडा करायचा असेल तर शरीर आणि मन या दोन पैलूवर स्वतंत्रपणे मंथन होणे गरजेचे आहे. आयुष्याच्या मध्यान्हापर्यंत शारीरिक कणखरता-सबळता वाढत जाते आणि मध्यान्हानंतर शारीरिक कणखरता-सबळता उतरणीला लागून माणसाचा सबळतेकडून-दुर्बलतेकडे प्रवास सुरु होतो.... हे जीवशास्त्रीय चिरंतन सत्य. आयुष्याच्या मध्यान्हानंतर हळूहळू शारीरिक दुर्बलता वाढत जाऊन सुदृढ आरोग्याची जागा नानातऱ्हेच्या व्याधी घ्यायला लागतात आणि पंचेन्द्रिय वृद्धत्वाकडे झुकायला लागतात. सृष्टीच्या समग्र इतिहासात यावर कधीही इलाज नव्हता आणि सृष्टीच्या अंतापर्यंत यावर कधी इलाज असणार नाही कारण सृष्टीने मनुष्य घडवला; मनुष्याने सृष्टीची रचना केलेली नाही. आपण ज्याला विज्ञान म्हणतो व ज्या विज्ञानाचा अहंकार मिरवत अनाठायी वर्तन करत सुटतो... ते विज्ञान केवळ सृष्टीच्या अभ्यासाचे अत्यंत किरकोळ असे एक साधन आहे आणि यापुढेही विज्ञानाची तितकीच प्रभावशक्ती असणार आहे. तसेच ज्याला आपण अध्यात्म म्हणतो ते स्वतःच स्वतःची समजूत घालत त्यानुरूप तत्वज्ञान निर्माण करत मनशांती मिळवण्याचे केवळ एक साधन आहे. यापलीकडे विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही शब्दाला फारसा काहीही अर्थ नाही आणि उपयोग तर नाहीच नाही.
            पण वाढत्या वयोमानाचे जे निकष शरीरशास्त्राला लागू पडतात तेच निकष मात्र मनशास्त्राला लागू पडत नाहीत. मानवी आयुष्यात मानसिक सुदृढता आणि मानसिक निर्बलता शारीरिक शक्तीवर किंवा वाढत्या-उतरत्या वयावर अवलंबून नसतेच उलटपक्षी शरीराची सुदृढता किंवा निर्बलता मानसिक कणखरतेवर अवलंबून असते. शरीर वृद्ध होणे आणि मन वृद्ध होणे या दोन परस्परभिन्न कार्य-प्रक्रिया-पद्धती आहेत. शरीराच्या वृद्धत्वावर सृष्टीचे नियंत्रण असले तरी मनाच्या वृद्धत्वावर नियंत्रण मिळवण्याची शक्ती सृष्टीने माणसाच्या स्वाधीन केली आहे. इतका मोघम विचार जरी लक्षात घेतला तरी शरीर अग्नीत जाळण्याचा किंवा मातीत पुरण्याचा क्षण येईपर्यंत मनाला चिरतरुण ठेवणे सहजशक्य आहे. अवघड तर मुळीच नाही.... मुळीच अवघड नाही फक्त त्यासाठी आपल्या आयुष्याची दिशा आणि जीवनचर्येचा प्राधान्यक्रम आखून घ्यावा लागेल.  (क्रमश:)
 
- गंगाधर मुटे आर्वीकर
 
एक/तीन/बावीस 
=-=-=-=
साठीचे हितगुज : भाग - २
साठीचे हितगुज : भाग - ३

साठीचे हितगूज : भाग - ४
 

==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

Gangadhar Mute
 

Share