आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने || रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने ||
न्यावा शिवाररानी | जागर सरस्वतीचा || ईडापिडा अव्यक्ती | पुरण्यास लेखणीने ||
सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, भूमीकन्या सीताकुटी
रावेरी ता. राळेगाव जि. यवतमाळ निमित्त
कोरोना अरिष्ट पर्यायी
ऑनलाईन वेबमिलन सप्ताह
दिनांक : २० ते २६ मार्च २०२१
मागील महिन्यापासून कोरोनाचा सार्वत्रिक वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता रावेरी येथील शनिवार, रविवार, २० व २१ मार्च २०२१ ला नियोजित ७ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करणे अवघड आणि जोखिमेचे झालेले आहे त्यामुळे सदर संमेलनाचे नव्याने नियोजन करून सुधारित स्वरूपात नाईलाजाने झूमच्या (Zoom) माध्यमातून ऑनलाईन वेबमिलन सप्ताह घेण्याचा पर्याय स्वीकारण्यात आलेला आहे. परिसंवाद, पारितोषिक, पुरस्कार वितरणासहित कार्यक्रम पत्रिकेत नसलेले सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असून कोरोना वातावरण निवळल्यावर नवीन तारखा ठरवून आयोजित केले जातील.
कार्यक्रमपत्रिका
प्रथम चरण
शनिवार, २० मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.३० : उद्घाटन सत्र
दीपप्रज्वलन, मराठी गौरवगीत, शेतकरी नमनगीत आणि उद्घाटन
शेतकरी नमनगीत : गुरुराज राऊत, गणेश मुटे, तेजू कोपरकर, विवेक मुटे
स्मरणिका प्रकाशन : शेतकरी स्त्री : गुलामाची गुलाम स्मरणिकेचे विमोचन.
संयोजक : मा. बाळासाहेब देशमुख, ट्रस्टी, सीतामंदीर, रावेरी
उदघाटक : मा. सरोजताई काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेत्या
प्रास्ताविक : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष
संमेलनाध्यक्ष : मा. वसुंधरा काशीकर, ज्येष्ठ शेती साहित्यिक
आभार : मा. राजेंद्र झोटींग
सूत्रसंचालन : मा. प्रा. मनीषा रिठे
=======
द्वितीय चरण
रवीवार, २१ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.०० : शेतकरी कवी संमेलन - १
अध्यक्ष : मा. अनुपमा जाधव (पालघर)
सूत्रसंचालन : मा. लक्ष्मी बल्की, यवतमाळ
सहभाग : मा. भूषण तांबे (ठाणे), मा. हिंमतराव ढाळे, मा. तुळशीरामजी बोबडे (अकोला), मा. किरण काशिनाथ, मा. सुमेध वासनिक (नागपूर), मा. प्रा. महेश कोंबे, मा. तेजस आंबाखाये (यवतमाळ), मा. नरेंद्र गंधारे, मा. डॉ. सुनील पखाले, मा. राजेश जौंजाळ, मा. अॅड. सुशांत बाराहाते, मा. किशोर महाजन, मा. संदीप धावडे, मा. नारायण निखाते, मा. वसंतराव गिरडे (वर्धा)
=======
तृतीय चरण
सोमवार, २२ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.३० : शेतकरी गझल मुशायरा
अध्यक्ष : मा. प्रा. चित्रा कहाते, नागपूर
सूत्रसंचालन : मा. प्राजक्ता पटवर्धन, पुणे
सकाळी ११.०० ते ११.५० : भाग -१
सहभाग : मा. गिरीशकुमार जोशी (औरंगाबाद), मा. आत्माराम जाधव, मा. आत्तम गेंदे, मा. महेश होनमाने, मा. यशवंत मस्के (परभणी), मा. कृष्णा जावळे (बुलडाणा), मा. आशालता आसुटकर, मा. अल्पना देशमुख-नायक, मा. गजेंद्रकुमार ठुने (यवतमाळ), मा. संजय तिडके (लातूर), मा. डॉ. रविपाल भारशंकर, मा. प्रदीप थूल, मा. धीरजकुमार ताकसांडे (वर्धा), मा. बाळ पाटील (उस्मानाबाद), मा. वीरेंद्र बेडसे (धुळे)
सकाळी १२.०० ते १२.५० : भाग -२
सहभाग : मा. बापू दासरी (नांदेड), मा. अझीझखान पठाण, मा. अनंत नांदूरकर (नागपूर), मा. मसूद पटेल (पुणे), मा. रमेश बुरबुरे, मा. प्रा. डॉ. सिद्धार्थ भगत (यवतमाळ), मा. महेश मोरे (सातारा), मा. बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर) मा. निलेश कवडे (अकोला), मा. गंगाधर मुटे (वर्धा)
======
चवथे चरण
मंगळवार, २३ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.०० : शेतकरी कवी संमेलन - २
अध्यक्ष : मा. प्रदीप देशमुख, चंद्रपूर
सूत्रसंचालन : मा. जयश्री कोटगीरवार, वर्धा
सहभाग : मा. प्रज्योत देशमुख (अकोला), मा. विनायक अंगाईतकर, मा. रत्नाकर वानखडे, मा. दिलीप भोयर (अमरावती), मा. पंडित निंबाळकर (अहमदनगर), मा. ॲड.लखनसिंह कटरे (गोंदिया), मा. अतुल येरगुडे (चंद्रपूर), मा. डॉ संगीता घुगे (नांदेड), मा. रवींद्र दळवी (नाशिक), मा. निलेश तुरके, मा. सचीन शिंदे, मा. राजेश अंगाईतकर (यवतमाळ), मा. प्रा. संजय कावरे (वाशीम), मा. स्मिता गांधी, पनवेल
========
पाचवे चरण
बुधवार, २४ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.०० : परिसंवाद
विषय : शेतीसाहित्यातील बदलते प्रवाह
वक्ते : डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. प्रा. डी. एन. राऊत
========
सहावे चरण
गुरुवार, २५ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.०० : शेतकरी कवी संमेलन - ३
अध्यक्ष : मा. अनुराधा धामोडे, पालघर
सूत्रसंचालन : मा. अनिकेत देशमुख, अकोला
सहभाग : मा. श्याम ठक (अकोला), मा. खुशाल गुल्हाणे (अमरावती), मा. महेश देसले (धुळे), मा. रावसाहेब जाधव (नाशिक), मा. विद्या लटपटे (परभणी), मा. जयश्री नांदे (पुणे), मा. लक्ष्मण लाड, मा. मुक्तविहारी, मा. दिवाकर जोशी, मा. सिद्धेश्वर इंगोले, मा. दत्ता वालेकर, मा. बालाजी कांबळे, मा. संजय आघाव, मा. सतीश कराड (बीड),
========
सातवे चरण
शुक्रवार, २६ मार्च २०२१
सकाळी ११.०० ते १२.०० : समारोपीय सत्र
विषय - दडायचे नाही, आता भिडायचे!
अध्यक्ष : मा. अॅड वामनराव चटप, ज्येष्ठ शेतकरी नेते
प्रमुख अतिथी : मा. अॅड दिनेश शर्मा, ज्येष्ठ शेती अभ्यासक
विशेष अतिथी : मा. ललित बहाळे, कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना
सन्माननीय अतिथी : मा. ऍड सतीश बोरुळकर, ज्येष्ठ अधिवक्ता, मुंबई हायकोर्ट
सूत्रसंचालन : मा. सुधीर बिंदू, युवा शेतकरी नेते
सहकार्याच्या प्रतीक्षेत!
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन