![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
पराटी...
मिरगाच्या किटकाले
चला हौशीन पुजूया
काळ्या मातीत आपल्या
चला पराटी पेरुया
वावरात पराटीचे
आज मोहरले फुलं
जसं अंगणात माह्या
हसते खेळते मुलं
आज फुलली पराटी
उद्या फुलं गळतीन
या पराटीच्या रोपाले
सुंदर बोंड येतीन
पहा माह्या वावरात
कशी निंगाली पराटी
आकाशी जशा चांदण्या
चमकती चांदराती
आज कापूस फुलला
चला सितादई करू
पांढर सोनं लुटुया
साजरा दसरा करू
होई वात समईची
सोन्याहून रे साजरं
जळे देवापाशी रोज
आमचं सोनं पांढरं
माह्यी पराटी सार्याची
अब्रु इज्जत राखते
शेवटी माह्य शरीर
कापडाले तरसते
हे पांढर सोन खपे
सारं कवडी मोलानं
सावकारी सरकारी
रे मोगलाई बोलानं
चुलीत भाकरीसाठी
काडी पराटीची जळे
चव चुलीच्या रोटीची
आमची आमाले कळे
.......निलेश कवडे , अकोला
प्रतिक्रिया
लेखनाचा विषय
लेखनाचा विषय "शेतकरी" असा नसून "शरद जोशी" असा आहे. त्यामुळे लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत किंवा कार्य अधोरेखीत करणारे किंवा शरद जोशींच्या विचारांचा ओझरता तरी उल्लेख करणारे असणे आवश्यक आहे.