पद्यकविता
शेतकऱ्याचा राजा बळीराजा
बळीनामा...
बळीराजा तुझे बळ ,
कोणा कुळानं गिळलं ;
तुझी वळचणीची दैना
येड्या कोण रे टाळील?...
सोस-सोसते उन्हाळे,
आला पाठीचा कातळ ,
तरी तुझ्या सपनात,
उगा सारी उष्टावळ...
भेगलेलं सुखसदा,
त्याची कर सांध मोड;
उगा रुताडाच्या भेनं
नको करू तडजोड...
तुझी जात शेषशाही
तिन हालव ही पृथ्वी;
बांडगुळांना विचार
अशी पिढी ही कितवी...
तुझा नेता बळीराम,
धारी त्याच्या बळीरामा:
वामनांना समजु दे,
तुझा खरा बळीनामा...
दिस वैेऱ्याचे होऊन
तुझ्या पेडी धडकती,
तरी जागा होउनिया
आता कर एकमती...
येवो एखादा बळीव
बुडो सारी दुःख बेटे,
कुणब्यांच्या काळजाची
देवा होवो एक पेठ...
इडा पिडा टळेल,
राज्य बळीचे कळेल,
फक्त हिरव्या धांदीत
सारी वंसळ बळेल..
साता जन्माचा मळभ
मरणाआधीच गळेल,
माझ्या हिरव्या बांडाचे
तेव्हा पारणे फिटेल....
यशवंत पुलाटे
दुर्गापूर ता.राहता
जि अहमदनगर
पिन कोड ४१३७३६
मो .न. 9657867499

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


लेखन छान आहे.
समीक्षक
लेखन छान आहे.
नवचैतन्य निर्माण करणारं काव्य
RANGNATH TALWATKAR
नवचैतन्य निर्माण करणारं काव्य,छान सर