नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतमालाचे भाव
हवामान बदलामुळे निसर्ग लहरी झाला. त्यामुळे शेती व्यवसाय हा
अनिश्चित नफा तोट्याचा झाला आहे भारतातील 90% शेतकरी हे शेतीला जोडधंदा न करता निव्वळ शेती करूनच जीवन जगतात .पावसाच्या लहरीपणामुळे कित्येकदा तोंडाशी आलेलं पीक वाया जाते
व्यापाऱ्यांवर असलेल्या शासनाच्या खास कृपादृष्टीमुळे शेतमालास योग्य भाव मिळत नाही .पिकाचा हंगाम जेव्हा असतो तेव्हा शेतकरी शेतात पैसे खर्च करून आर्थिक दृष्ट्या मोडकळीस आलेला असतो आणि त्याला शेतमाल विकणे भाग असते याच संधीची वाट व्यापारी बघत असतात. त्यावेळी व्यापारी सामूहिक रित्या शेतकऱ्याची लूट करत असतात आणि त्यामुळे शेतकऱ्याने शेतीत केलेला खर्च सुद्धा त्यांच्या हातात येत नाही. शेती करिता खर्च करताना पैसे संपले की बळीराजा कधी काळी विकत घेतलेले पत्नीचे दागिने सावकाराकडे गहाण ठेवतो. दरसाल दर शेकडा 36% प्रमाणे. हा सावकारी पाश दूर करण्याकरिता आणि कौटुंबिक खर्च भागवण्याकरता शेतकरी आपला शेतमाल व्यापाऱ्यांना कमी भावात विकून टाकतो याशिवाय त्याला पर्याय नसतो .
शेतमालाचे भाव सतत अस्थिर राहिलेले आहेत यावर्षी तुरीला चांगला भाव म्हणून पुढील वर्षी तूरीचा पेरा शेतकरी वाढवतात आणि पीक आले की व्यापारी तुरीचा भाव कमी करुन देतात. आणि शेतकऱ्याची निराशा होते
शेतमालाला हंगाम संपल्यानंतर भाव मिळेल या आशेपोटी काही शेतकरी आपला शेतमाल साठवून ठेवतो पण भाव वाढतच नाही आणि साठवलेल्या मालाचे वजन आणि प्रत दोन्ही कमी होऊन त्याला कमी भावानेच शेतमाल विकावा लागतो. कामगार समस्या ही शेती व्यवसायातील सर्वात मोठी अडचण आहे. हंगामाच्या वेळेवर मजूर मिळाले नाही तर तनानच पीक खाल्लं असं होते .तनाने शेत भरले की निंदणाचा खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी होते. मजुरांच्या तुटवड्यामुळे बाहेरगावातून किंवा शेजारी राज्यातून मजुर आणावे लागतात आणि त्याकरिता शेतकऱ्यालाच खर्च करावा लागतो आणि शेतीचा खर्च वाढतो. शेतात पेरणी करीता लागणारे बियाण्याचे तसेच रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचे बेसुमार वाढलेले भाव यामुळे शेतीचा खर्च वाढलेला आहे .रासायनिक खते आणि कीटकनाशके यामुळे जमीन निर्जीव होत आहे आणि त्यामुळे दरवर्षी रासायनिक खताचे प्रमाण शेती उत्पन्न मिळण्याकरिता करिता वाढवावे लागत आहे कीटकांमध्ये विषप्रतिरोध क्षमता वाढल्यामुळे त्यांचे नियंत्रणाकरिता महागडे कीटकनाशके वापरावे लागत आहे .निसर्गाच्या अनियमित पावसामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ येते किंवा हाताशी आलेले पीक वाया जाते आणि शेतीचा खर्च वाढतो
महागाई वाढत आहे शेती करिता खर्च वाढत आहे मग गतवर्षीच्या शेतमालास मिळालेला भाव यावर्षी वाढीव का नाही ?तो गत वर्षीपेक्षाही कमी मिळतो. ही शोकांतिका आहे
शेतमालास योग्य भाव मिळण्याकरिता १)शेतकऱ्यांनी संघटित होणे आवश्यक आहे
२) शासन शेतकऱ्याचे हिताचे असावे.
३) शेतमालाचे आयात निर्यात धोरण शेतकऱ्याचे हिताचे असावे
४) शेती करता नियमित विज पुरवठा व्हावा
५) बियाणे खते कीटकनाशके स्वस्त दरात उपलब्ध व्हावे
६) शेती उत्पादन वाढण्याकरिता विविध उपाययोजना कराव्यात
या सर्व शेतकरी हिताच्या गोष्टी होण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनासोबत संघर्ष करून आपला हक्क मिळवावा
लेखक - विनायक अंगाईतकर
पत्ता - उत्तम नगर, अंजनगाव सूर्जी
मो. नं.- 9021627407