पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
सूडाग्नीच्या वाटेवर…….
माझी गझल ऐकण्यास गर्दी लोटली होती काही जागीच नव्हती, बाकी झोपली होती
वादंगाचा दुरावा पंक्तीत उरला नाही डावी उपाशी नव्हती, उजवी जेवली होती
घामचोरीची तक्रार दाखल केली तेव्हा विरोधक प्रसन्न नव्हते, सत्ता कोपली होती
सूडाग्नीच्या वाटेवर गतीरोधक नसतात सलवार विझली नव्हती, पगडी पेटली होती
नियतीचे सारे घाव निग्रहाने पेललेत संधी दवडली नव्हती, अभये वेचली होती
गंगाधर मुटे .................................................... (वृत्त - मात्रावृत्त )
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.