नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"हाडाचे शेतकरी "
आम्ही हाडाचे शेतकरी
भक्ती आमची शेतावरी ||धृ||
आम्ही राबतो शेतात
देव दर्शन देई पिकात
आम्ही कष्टतो शेतात
देव डोलतो भातात ||1||
हिरवं करीतो शिवार
फुलवतो भू चं या आवार
तिच देई आम्हा धान्य अपार
तिच दातृत्व रे फार. ||2||
दिनभर करीतो काम
शेतात गाळतो घाम
तेव्हा मिळे कुठे दाम
उभा पाठी तो श्रीराम ||3||
आम्हा सावली ना माहित
आम्ही राबतो उन्हात
काम नाही कधी थांबवत
आम्ही पाहतो देशाच हित ||4||
शरद ठाकर
सेलू जि परभणी
प्रतिक्रिया
सुरेख
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
हाडाचे शेतकरी
सुंदर.
हेमंत साळुंके
पाने